सावधान नागरिकांनो शासन सतर्क! सोलापूर जिल्ह्यातील गावागावांत देणार बूस्टर डोस; कोरोनाच्या चाचण्या वाढविणार
मुंबईसह इतर शहरांमध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येत आहेत. त्यादृष्टीने राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना परिस्थिती हाताळण्यासाठी पूर्व उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बूस्टर डोस देण्यासाठी शिबिरे घेण्यात येणार आहेत.कोरोना रुग्णाची २० संख्या ग्रामीण भागामध्ये आहे. तरीसुद्धा आरोग्य यंत्रणेमार्फत सतर्कता वाढली जात आहे.
राज्य शासनाकडून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला याबाबत निर्देश मिळाले आहेत. जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधित लसीकरणाच्या पहिल्या डोसचे प्रमाण ८६ टक्के, दुसऱ्या डोसचे प्रमाण ७६ टक्के आहे. बूस्टर डोस १ लाख १८ हजार जणांनी घेतला आहे
0 Comments