सांगोला येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते हिरकणी कक्षांचे भूमिपूजन
सांगोला(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क न्यूज) :सोलापूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते सांगोला पंचायत समितीच्या आवारात हिरकणी कक्षाचे भूमिपूजन करण्यात आले
या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आनंद लोकरे सहाय्यक गटविकास अधिकारी विकास काळुंखे ग्रामीण
पाणीपुरवठा उप अभियंता सुरेश कमळे जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता बाळासाहेब नकाते एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी आतार मॅडम आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून भूमिपूजन करण्यात आले
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी हिरकणी कक्षाचा वापर योग्य त्या कारणासाठीच व्हावा
तसेच बांधकामाचे नियोजन योग्य असावे पाण्याची सोय व्यवस्थित असावी हिरकणी कक्ष हा नियोजनबद्ध सर्व सोयी सुविधा युक्त पद्धतीने बांधलेला असावाअसे मत स्वामीं यांनी व्यक्त केले
सांगोला पंचायत समितीच्या आवारात एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत सांगोला तालुक्यातील महिला कर्मचारी तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या
महिलांना स्तनदा मातांना आपल्या बाळाला स्तनपान करता यावे, याकरिता हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे
नवजात बालकांच्या कुपोषणमुक्तीसाठी २०१२ मध्ये राज्य सरकारने एसटी बसस्थानकांसह सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये
हिरकणी कक्ष उभारण्याचा निर्णय घेतला होता. स्तनदा मातांना आपल्या बाळाला स्तनपान करता यावे, याकरिता हिरकणी कक्ष ही संकल्पना कामकाजी महिलांसाठी चांगली आहे.
६० बाय ६० च्या स्वतंत्र हिरकणी कक्षाची सुविधा असावी, असे धोरण २०१२ मध्ये महाराष्ट्र सरकारने जाहीर केले. सरकारी कार्यालय मध्ये महिला कर्मचारी असताना
देखील अद्याप पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील सरकारी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांना तसेच स्तनदा मातांच्या नाशिबीच हिरकणी कक्षा नसल्याने महिलांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती
म्हणूनच सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्ह्यातील पहिलेच हिरकणी कक्ष सांगोला पंचायत समितीमध्ये उभा करण्याचा निर्णय घेऊन
मंगळवार रोजी दिनांक 25 रोजी दुपारी दोन वाजता पंचायत समितीच्या आवारात हिरकणी कक्षाचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले
या कार्यक्रमाप्रसंगी सांगोला पंचायत समितीचे सर्व अधिकारी पत्रकार विकास वाघमारे सचिन भुसे एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे
सर्व अधिकारी पाणीपुरवठा विभागाचे सर्व शाखा अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता तसेच सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते
0 Comments