google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज... अजित पवार अखेर भाजपमध्ये ४० आमदारांसह केला प्रवेश

Breaking News

ब्रेकिंग न्यूज... अजित पवार अखेर भाजपमध्ये ४० आमदारांसह केला प्रवेश

ब्रेकिंग न्यूज... अजित पवार अखेर भाजपमध्ये ४० आमदारांसह केला प्रवेश

अजित पवार ३५-४० आमदारांसह भाजपासोबत सत्तास्थापनासाठी सज्ज झाल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात उत आला आहे. अशातच शरद पवारांनी कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील

 तर तो त्यांचा प्रश्न असं विधान केल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु आहेत. पण भाजपला अजित पवार का हवे आहेत? असा सवाल उपस्थित होत आहे.

अजित पवार ४० आमदारांसह भाजपा मध्ये?
एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, अजित यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यांना राष्ट्रवादीच्या ३५-४० आमदारांचा पाठिंबा आहे, त्यामुळे पक्षांतर विरोधी कायदा लागू होणार नाही.

 मात्र, त्यांच्यासोबत गेलेल्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा आहे की त्यांनी पक्षाचे संस्थापक शरद पवार यांची संमती मिळावी, जेणेकरून 2019 मध्ये भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा फसवणूक टाळता येईल.

 भाजपला अजित पवार का हवे आहेत?
 महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची वाढती लोकप्रियता भाजपसाठी अडचणीची ठरली आहे. उद्धव गटाने पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह गमावले असले तरी त्यांच्या लोकप्रियेतेत किंचतसाही फरक पडलेला नाही. 

याशिवाय भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात महाविकास आघाडीला राज्यातील लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी ३३ जागा जिंकता येतील. या सर्वेक्षणामुळे भाजप नेत्यांचीही झोप उडाली आहे.

अजित पवार यांना भाजपा करणार मुख्यमंत्री?
 भाजपला कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र गमावायचा नाही. त्यामुळे भाजपला राज्यात मराठा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी द्यायचा आहे. त्यामुळे भाजप अजित पवारांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहे. 

राज्यात 35 टक्के मराठा आहेत.भाजपशी हातमिळवणी करण्याच्या मुद्द्यावरून शरद पवार यांनी अजित पवारांना याबाबत स्वतः निर्णय घेण्यास सांगितले आहे.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा सिल्वर ओकवर झाली होती चर्चाकाही दिवासांपूर्वी, उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊतदेखील शरद पवार यांच्या भेटीला सिल्वर ओकवर गेले होते. त्यावेळी चर्चेदरम्यान अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चेवर शरद पवार काय म्हणाले? 

याचा खुलासा राऊत यांनी रोखठोकमध्ये केला आहे. श्री. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शरद पवारांना भेटलो. ते म्हणाले, कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही, 

पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण 'पक्ष' म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही.

 महाराष्ट्रातील लोकांत सध्याच्या सरकारबद्दल कमालीचा संताप आहे. जे आता भाजपबरोबर जातील ते राजकीय आत्महत्या करतील असे पवार-ठाकरे यांचे मत पडले. असे राऊतांनी रोखठोकमध्ये म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments