google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला पोलिसांनी चोरीस गेलेल्या १० मोटरसायकली व ५ मोबाईल जप्त करूनसांगोला पोलिसांना आरोपीच्या मुसक्या आवळल्या !

Breaking News

सांगोला पोलिसांनी चोरीस गेलेल्या १० मोटरसायकली व ५ मोबाईल जप्त करूनसांगोला पोलिसांना आरोपीच्या मुसक्या आवळल्या !

सांगोला पोलिसांनी चोरीस गेलेल्या १० मोटरसायकली व ५ मोबाईल जप्त करून

सांगोला पोलिसांना आरोपीच्या मुसक्या आवळल्या !

सांगोला तालुका / प्रतिनिधी ; सांगोला पोलिसांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारास पकडून त्यांच्याकडून १० मोटरसायकल व गहाळ झालेले 

५ मोबाईल असा एकूण ३ लाख ५८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली.

तालुक्यातील मोटरसायकलच्या वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेऊन यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. 

दिनांक २० एप्रिल रोजी संगेवाडीतील मेथवडे फाटा ता. सांगोला येथे एक व्यक्ती  कमी किमतीत व कागदपत्रे नसलेल्या मोटारसायकलची विक्री करीत असल्याची बातमी गोपनीय खब-या  मार्फत पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोधून त्या व्यक्तीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचे नाव सागर दुर्योधन धांडोरे रा. अजनाळे, ता. सांगोला असल्याचे उघड झाले. 

या व्यक्तीने कोल्हापूर, पंढरपूर, मंगळवेढा इथून मोटरसायकलची चोरी करून संगेवाडी (मेथवडे फाटा) येथे काम करीत असलेल्या ठिकाणी लपवून ठेवल्या होत्या. पोलिसांनी सदर ठिकाणाहून २ लाख ९० हजार रुपये किमतीच्या मोटरसायकली जप्त केल्या .

मोटरसायकल चोरीबरोबरच पोलिसांनी सांगोला आठवडा बाजार येथून चोरीस गेलेले ५  व्हिओ कंपनीचे व एक ओपो कंपनीचा पाच मोबाईल शोधण्यास यश आले आहे. ७८ हजार ५०० रुपयांचे ५ मोबाईल पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करून हस्तगत केले आहेत.

 या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष ,सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, 

पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता वजाळे, अभिजीत मोहोळकर, बाबासाहेब पाटील, सुजित जाधव, लक्ष्मण वाघमोडे व सायबर पोलीस स्टेशनकडील युसुफ पठाण यांनी मदत करून गुन्हे उघडकीस आणले आहेत.

Post a Comment

0 Comments