ब्रेकींग न्युज सोलापूर तीन हजारांची लाच घेताना एक्साईजचे निरीक्षक, दुय्यम निरीक्षक व कॉन्स्टेबलला रंगेहाथ अटक.
तीन हजाराची लाच घेताना एक्साइजच्या निरीक्षक, सहाय्यक दुय्यम निरीक्षक, महिला कॉन्स्टेबलला अँटीकरप्शने रंगेहात पकडले
बार अँड रेस्टॉरंटच्या नवीन आर्थिक वर्षाच्या स्टॉक रजिस्टरवर शिक्के मारून देण्यासाठी तडजोडे अंतिम हजाराची लाच घेताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक सहाय्यक दुय्यम निरीक्षक व एका महिला कॉन्स्टेबलला रंगेहात पकडण्यात आले आहे.
संभाजी साहेबराव फडतरे, पद – निरीक्षक, वर्ग 2, श्रीमती प्रियंका बबन कुटे, पद – महिला कॉन्स्टेबल, वर्ग 3, सिद्धाराम आनंदेंनप्पा बिराजदार पद – सहा. दुय्यम निरीक्षक, वर्ग 3 सर्व नेमणूक राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
यातील तक्रारदार यांचे बार अँड रेस्टॉरंट असून सदर बार अँड रेस्टॉरंट च्या अनुषंगाने असलेले स्टॉक रजिस्टर व ब्रँड रजिस्टर नवीन आर्थिक वर्षाच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभाग
सोलापूर येथून शिक्के मारून घेण्यासाठी (प्रमाणित करून) देण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर येथील महिला जवान आरोपी क्र. 2. श्रीमती प्रियांका कुटे व आरोपी क्र. 3. बिराजदार यांनी स्वतःसाठी व साहेबांसाठी 4,000 रू लाचेची मागणी केली असता,
आरोपी क्र. 1. निरीक्षक फडतरे यांनी सदर लाच रक्कमेमध्ये तडजोड करून 3,000 रू. लाच रक्कम श्रीमती कुटे यांच्याकडे देण्यास सांगितली.
त्यानंतर झालेल्या सापळा कारवाई मध्ये आलोसे श्रीमती कुटे यांनी लाच रक्कम स्वीकारली असून त्यानंतर यातील नमूद तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई गणेश कुंभार, पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार- सोनवणे, घाडगे, मुल्ला, किनगी, पवार, घुगे व चालक उडानशिव सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो, सोलापूर यांनी पार पाडली.


0 Comments