google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा, राज्यात पुन्हा उडणार निवडणुकींचा धुराळा

Breaking News

मोठी बातमी निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा, राज्यात पुन्हा उडणार निवडणुकींचा धुराळा

 मोठी बातमी निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा, राज्यात पुन्हा उडणार निवडणुकींचा धुराळा

निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील निवडणुकांबद्दल मोठी घोषणा करण्यात आली आहे. आयोगाकडून गावगाडा चालवणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका घोषित करण्यात आल्या आहेत. 

राज्यभरातील सुमारे 2 हजार 620 ग्रामपंचायतीतील 3 हजार 666 सदस्य आणि 126 थेट सरपंचांच्या रिक्तपदांचा पोटनिवणुकांसाठी ही निवडणूक होणार आहे. 

निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होणार आहे. 

18 मे 2023 रोजी या निवडणुकीसाठी मतदान पार पडेल.गेल्या काही काळापासून राज्यातील राजकारणाचे पडसाद गाव स्तरावर देखील पहायला मिळत आहेत. त्यामुळे आताच्या निवडणुकीत देखील मोठी रस्सीखेच पहायला मिळू शकते.

Post a Comment

0 Comments