google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला डॉ.अविनाश सांगोलेकरना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वांड्मय पुरस्कार प्रदान

Breaking News

सांगोला डॉ.अविनाश सांगोलेकरना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वांड्मय पुरस्कार प्रदान

सांगोला डॉ.अविनाश सांगोलेकरना

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वांड्मय पुरस्कार प्रदान

सांगोला :(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सेवानिवृत्त मराठी विभागप्रमुख,ज्येष्ठ

 साहित्यिक,समीक्षक, संशोधक व सांगोल्याचे सुपूत्र,डॉ.अविनाश सांगोलेकर यांना त्यांच्या “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचे काव्य वांड्मय : एक शोध” या समीक्षा लेखसंग्रहासाठी 

२०२३ चा “साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वांड्मय पुरस्कार”हा पुरस्कार सावित्रीबाई फुले,पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.कारभारी काळे,पद्मश्री दादा इदाते व पद्मश्री रमेश पतंगे यांच्या हस्ते नुकताच समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.

सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असून  सावित्रीबाई फुले,पुणे विद्यापीठाचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन,विद्यार्थी विकास मंडळ, समरसता साहित्य परिषद

 (महाराष्ट्र) व मातंग साहित्य परिषद,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.सांगोलेकर यांचेसह महाराष्ट्रातील इतर अनेक लेखकांनाही हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.   म.फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित

 करण्यात आलेल्या या समारंभास विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रवींद्र शिंगणापूरकर,प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे,आमदार सुनील कांबळे,समरसता साहित्य परिषदेचे कार्यवाह 

डॉ.प्रसन्न पाटील,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख डॉ.सुनील भंडगे,विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे,मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक,अध्यक्ष डॉ.धनंजय भिसे हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments