google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील प्रलंबित घरकुल पूर्ण न केल्यास फौजदारी होणार

Breaking News

सांगोला तालुक्यातील प्रलंबित घरकुल पूर्ण न केल्यास फौजदारी होणार

 सांगोला तालुक्यातील प्रलंबित घरकुल पूर्ण न केल्यास फौजदारी होणार

गेल्या पाच वर्षांत सांगोला तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेंतर्गत ७, ९८८ मंजूर घरकुलांपैकी ५४९८ घरकुले पूर्ण झाली, 

तर राज्य शासन पुरस्कृत रमाई आवास योजनेंतर्गत १५२६ मंजूर घरकुलांपैकी ११५७ घरकुले पूर्ण झाली आहेत. अद्यापही दोन्ही योजनांतील २७४९ घरकुलांची बांधकामे अपूर्ण आहेत. 

प्रलंबित घरकुल तीन महिन्यांत पूर्ण न केल्यास लाभार्थ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा गटविकास अधिकारी आनंदराव लोकरे यांनी दिला आहे. 

सांगोला तालुक्यात सन २०१६ ते २०२१ या पाच वर्षांत प्रधानमंत्री आवास योजनेतील २३८८ घरकुलांचीबांधकामे अपूर्ण आहेत. राज्य शासन पुरस्कृत रमाई

आवास योजनेंतर्गत सन २०१६ ते २०१७ ते सन २०१९-२० या कालावधीत १५५६ घरकुलांना मंजुरी मिळाली होती.

 त्यापैकी ३६१ घरकुले अपूर्ण आहेत. प्रलंबित घरकुल बांधकामांना गती देण्यासाठी पंचायत समिती स्तरावर घरकुल विभागाकडून लाभार्थ्याकडे वेळोवेळी पाठपुरावा सुरु आहे.

 मात्र, अनेक लाभार्थ्यांना जागेअभावी प्रलंबित असणाऱ्या घरकुल योजनेला पुन्हा गती देण्यासाठी पंचायत समिती प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे.

घरकुल बांधकामासाठी जागा नसणाऱ्या लाभार्थ्यांनाग्रामपंचायत स्तरावरून जागा उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. 

त्याचबरोबर लाभार्थ्यांनी जागा खरेदी केल्यास त्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेंतर्गत ५० हजार रुपये अनुदान देण्याची शासनाची योजना आहे. 

भूमिहीन लाभार्थ्यांनी जागेसाठी शासनाच्या अनुदानाचा लाभ घ्यावा. असे आनंदराव लोकरे गटविकास अधिकारी, म्हणाले

Post a Comment

0 Comments