google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उत्कृष्ठ सेवेस आंतरराष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त एन.ए. बी.एच मिळवणारे तालुक्यातील पहिले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

Breaking News

सांगोला स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उत्कृष्ठ सेवेस आंतरराष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त एन.ए. बी.एच मिळवणारे तालुक्यातील पहिले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

सांगोला स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उत्कृष्ठ सेवेस आंतरराष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त

एन.ए. बी.एच मिळवणारे तालुक्यातील पहिले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

सांगोला प्रतिनिधी (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)

सांगोला वेल्फेअर असोसिएट संचालित स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ला अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी 'नॅशनल  अॅक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अॅन्ड हेल्थकेअर प्रोव्हायडर' (एनएबीएच) ची अधिस्वीकृती मिळाली आहे.

 हॉस्पिटलच्या विश्वासार्ह सेवेला मिळालेली ही पोचपावती असून भविष्यात अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही डॉ.प्रभाकर माळी, डॉ.पियुष पाटील,डॉ सचिन गवळी,डॉ संजय देशमुख यांनी दिली. 

रुग्ण सेवेला सर्वोच्च प्राधान्य देऊन अचूक निदान व किफायतशीर दरात योग्य उपचार यामुळे हॉस्पिटलने वेगळी ओळख निर्माण केल्याचे डॉ. पियूष पाटील यांनी सांगितले.

'एनएबीएच'च्या अधिस्वीकृतीमुळे हॉस्पिटलकडून दिल्या जात असलेल्या गुणवत्तापूर्ण व विश्वासार्ह रुग्णसेवेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

 या पुढील काळात रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही डॉ. पियूष पाटील यांनी दिली.

 स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे डॉ किरण जगताप व विनायक लोखंडे यांनी यांनी 'एनएबीएच' च्या अधिस्वीकृतीमुळे हॉस्पिटलच्या विश्वासार्हतेत अधिक वाढ होईल

 व त्याचा फायदा रुग्णांनाच होईल, असे सांगितले. आमच्या सर्व  सहकाऱ्यांनी घेतलेल्या अथक प्रयत्नाचे हे यश असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले. 

फिजिसियन डॉ शैलेश डोंबे,डॉ अजिंक्य नष्टे, डॉ अतुल बोरोटे,डॉ यशोदीप गायकवाड डॉ.निलेश इंगवले,डॉ महेश लिगाडे,डॉ मेघना देवकते यांनी 'एनएबीएच' च्या मान्यतेमुळे आपल्या सर्वांची जबाबदारी अधिकच वाढली 

असून सांघिक प्रयत्नातून ती निश्चितच पूर्ण करू, असा विश्वास व्यक्त केला व सांगोला तालुक्यातील पेशंट व नातेवाईक यांच्या विश्वासाला पात्र राहू अशी ग्वाही दिली.

भविष्यामध्ये स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल वेगवेगळ्या शासकीय योजना,इन्शुरन्स कंपनी,या माध्यमातून जास्तीत जास्त रुग्णाची सेवा करण्यास सक्षम असेल असा विश्वास व्यक्त केला.

डॉ पियूष  साळुंखे पाटील यांनी एनएबीएचच्या कार्यपद्धतीची माहिती देताना रुग्णांना सर्वोत्तम आरोग्यसेवा मिळवून देणे,

 रुग्णाच्या सुरक्षिततेची काळजी घेणे, सर्व प्रकारच्या सरकारी, निमसरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे यासाठी “रुग्णालये व आरोग्यसेवेसाठीचे राष्ट्रीय अधिस्वीकृती मंडळ' (एनएबीएच) कार्यरत असल्याचे सांगितले.

 रुग्णालयातर्फे दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधा, सेवा, उपचार या सर्व बाबी लक्षात घेऊनच अशा प्रकारची मान्यता 'एनएबीएच' कडून दिली जाते. 'एनएबीएच'ची अधिस्वीकृती मिळवण्याच्या प्रक्रियेत संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर माळी, 

डॉ वैभव जांगळे,डॉ योगेश बाबर,डॉ गणेश गुरव,डॉ सौरभ अजळकर,डॉ राहुल इंगोले यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याच बरोबर हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ यांच्या मदतीशिवाय हे शक्य नव्हते असे डॉ पाटील यांनी सांगीतले.

Post a Comment

0 Comments