सांगोला कोळा गावचा गवंड्याचा मुलगा चित्रपट निर्माता अभिनेता संग्राम काटेचा प्रवास...
सांगोला वार्ताहर(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)
सोलापूर जिल्ह्यातील कोळे या खेडेगावातील एका सर्वसामान्य कुठुबातील एका गवंड्याचा मुलगा
" संग्राम भीमराव काटे" याने एक वर्षांपूर्वी एक मराठी ऍक्शन चित्रपट बनवण्याचा ध्यास मनात ठेवून चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाचे नाव "उगराट" असे असून
हा चित्रपट फुल ॲक्शन, रोमान्स, लव्ह स्टोरी ,कॉमेडी, मैत्री अशा सर्व गोष्टींनी भरलेला असून या चित्रपटाचा मुख्य उद्देश हा खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांवरती होणारा अन्याय- अत्याचार व सावकारीतून गरिबांची होणारी पिळवणुक यावर "उगराट " हा चित्रपट आधारित आहे.
निर्माते, त्लेखक संग्राम काटे व सहनिर्माते बहुचर्चित बिजनेस मॅन व रामा फलटने चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष"अशोक आबा नरळे-फलटणे" हे आहेत.
या चित्रपटातील प्रमुख नायक हे संग्राम काटे , प्रमुख नाईका सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय का फेम " प्राची पालवे "व रील स्टार “सानिका शिंदे" या दोन प्रमुख नाईका आहेत.
त्याचबरोबर या चित्रपटांमध्ये सैराट फिल्म भक्ती चव्हाण, लक्ष मालिका फेम अनिकेत केळकर ,प्रमुख खलनायक राजेंद्र जाधव ,प्रीतम भंडारे ,अशोक ठोंबरे ,व आशिष वाघमारे असे नावाजलेले कलाकार आहेत. त्याचबरोबर या चित्रपटाचे दिग्दर्शन हे "आकाश तुळसे "यांनी केलेले आहे.
या चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग कोळे व तिप्पेहाळी येतील रामा फलटणे फार्म हाऊस, जुनोनी, पाचेगाव , किडेबिसरी , गौडवाडी नागज ,सांगोला ,मंगळवेढा ,पंढरपूर, सोलापूर ,अशा बऱ्याच ठिकाणी झालेले आहे .
या चित्रपटाला व संग्राम काटे याला बऱ्याच आर्थिक व मानसिक अडचणींना सामोरे जावे लागले. पण कोळे व तिप्पेहाळी ,जुनोनी गावातील परिसरातील लोकांनी या चित्रपटासाठी बरेच योगदान दिले, त्यामध्ये अशोक नरळे (फलटणे) सर, श्रीमंत सरगर शेठ,
सुरेश आलदर, सचिन देशमुख, नामदेव मदने, शहाजी हातेकर, तुकाराम (दादा )पुढारी पत्रकार जगदीश कुलकर्णी ,प्रल्हाद मेटकरी दिलीप देशमुख ,हरिभाऊ कोळेकर ,
शिवाजी कोळेकर, दगडू कोळेकर, किरण पांढरे ,संतोष करांडे, विष्णू नरळे, भीमराव आलदर ,प्रभू कोरे,
सचिन मोहिते ,रमेश माळी,गणेश देशमुख, अरुण बजबळकर, निलेश मदने, श्रीकांत मोरे ,राजू काटे, व कोळे जुनोनी परिसरातील अनेक प्रतिष्ठित व सर्वसामान्य लोकांनी आपापल्या परीने मोलाचे आर्थिक व मानसिक योगदान दिले.
एक वर्षापूर्वी सुरू झालेल्या चित्रपटाचे शूटिंग समारोपाचा श्री विलास नरळे- फलटणे यांच्या हस्ते फलटणे फार्म हाऊसवर फोडून व कोळा नगरीच्या सर्व सन्माननीय नेत्यांच्या हस्ते फोडून अडचणीतून मार्ग काढत मोठ्या उत्साहात पार पडले ....
0 Comments