ब्रेकिंग! सोलापूर जिल्ह्यात गारांचा पाऊस कांदा, मका व भाजीपाल्यांच्या पिकांसह फळबागांचे नुकसान
मार्च महिन्याचा तिसरा आठवडा सुरू झालेला असताना ऐन उन्हाळ्यात राज्यातील अनेक भागांमध्ये अलीकडे अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
सोलापूर, जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वीजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांची चांगली धावपळ उडाली. याशिवाय ग्रामीण भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.
आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाने कांदा, मका व भाजीपाल्यांच्या पिकांसह फळबागांचे नुकसान झाले आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्यातील किणी येथे आणि पंढरपूर येथे चक्क गारांचा पाऊस पडला आहे.


0 Comments