सोलापुर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट..रुग्ण हक्क संरक्षण समिती सोलापुर टिमच्या वतीने कारवाई करण्याची जिल्हाधिकारी यांना मागणी..
सोलापूरः- रुग्ण हक्क संरक्षण समिती हि संपुर्ण महाराष्ट्रात बोगस डॉक्टर विरोधी अभियान राबवित आहे परंतु प्रशासन बोगस डॉक्टर विरोधात कारवाई करण्यात कायम उदासीन आहे. सोलापूर जिल्ह्यात पण बोगस डॉक्टरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे म्हणून .
संपुर्ण सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन सोलापुरचे जिल्हाधिकारी यांना रुग्ण हक्क संरक्षण समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुमित भांडेकर यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या वतीने देण्यात आले.
.... कोणतीही वैद्यकीय पदवी नसलेले, फक्त अनुभवाचा अत्यल्प ज्ञानावर हे बोगस डॉक्टर रुग्ण तपासुन त्यांना कुठलेही औषध गोळया खायला देऊन रुग्णांना सर्रास इंजेक्शन देऊन रुग्णांचा जिवितासोबत खेळतात. यामुळे रुग्णांचा जिवितास धोखा निर्माण होत आहे.
कोणताही डॉक्टर हा बोगस आहे का नाही हे रुग्णांना समजत नाही याचा गैरफायदा घेत असे बोगस डॉक्टर हे बिनदास्त वैद्यकीय व्यवसाय करतात या अश्या बोगस डॉक्टरांचा प्रशासनाने शोध घेऊन त्याचावर कारवाई करावी
अशी मागणी सोलापुर जिल्हाधिकारी यांना रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे यावेळी समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुमित भांडेकर,सोलापूर शहराध्यक्ष अकबर शेख,राजेश राऊळ,सादिक शेख आदी उपस्थित होते


0 Comments