google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 देशाच्या विकासात महिलांचेही योगदान अचकदाणीत अस्मिता साळुंखे यांचे प्रतिपादन

Breaking News

देशाच्या विकासात महिलांचेही योगदान अचकदाणीत अस्मिता साळुंखे यांचे प्रतिपादन

 देशाच्या विकासात महिलांचेही योगदान अचकदाणीत अस्मिता साळुंखे यांचे प्रतिपादन

सांगोला प्रतिनिधी (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)

देशाच्या सर्वांगीण विकासात पुरुषांइतकाच महिलांचा सहभाग आहे. आज सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिला कर्तव्यावर आहेत. देशाच्या विकासाला हातभार लावत आहेत. 

पूर्वी महिलांची व्याख्या चूल व मूल अशी होती, आता त्या व्याख्येत बदल झाला आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. 

हे सर्व काही घडले ते केवळ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे, असे आनंदी संस्थेच्या संचालिका अस्मिता साळुंखे यांनी सांगितले. 

अचकदाणी (ता. सांगोला) येथे ग्रामपंचायतीतील कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अस्मिता साळुंखे व सरपंच पूनम पाटील या होत्या.

नंतर गावातून बेटी पढाओ, बेटी बचाओ जनजागृतीसाठी महिला व विद्यार्थी यांची मोटारसायकल रॅली काढली. मुलींना चार दिवस स्वरक्षणाचे धडे देण्यात आले.

 लहान कुटुंब, सुखी कुटुंब यावर एक ते दोन मुलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलांचा सत्कार ग्रामसेविका सुषमा मोरे यांच्या वतीने करण्यात आला. नवजात मुलींचे स्वागत केले. त्या मुलींच्या मातेचे ओटीभरून बेबीकिट भेट देण्यात आले.

 या वेळी उपसरपंच शिवाजी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्या रेश्मा मोरे, सुनंदा गंभीरे, विमल बुधावले, राधाबाई कोळेकर, मिनाज मुलाणी, रेश्मा जावीर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, अशा वर्कर, आरोग्य सेविका, शिक्षिका उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments