सांगोल्यात कर्मचारी संपामुळे नागरिकांची गैरसोय
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)
सांगोला शहरांमध्ये काही कार्यालय चालू असून काही कार्यालय बंद ठेवण्यात आले आहेत काही कार्यालयातील कर्मचारी संपावर मात्र काम चालू अशी स्थिती दिसून येत आहे. कर्मचारी वर्गांच्या संपामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.
तहसील कार्यालयातील सर्व विभागातील काही ऑफिसला टाळे लावलेले दिसून आले. तहसीलदार यांचे केबिन उघडी आहे परंतु तहसीलदार मात्र गैरहजर दिसून आले ग्रामीण भागातून तहसील कार्यालयातील कामासाठी परगावहून येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाल्याचे दिसून येत आहे
तहसील कार्यालयाच्या प्रांगणात लेखनिक मुद्रांक विक्रेते दस्त लेखनिक आधी कागदपत्र लिहिणारे टायपिस्ट यांची अवस्था बिकट झाली आहे. दुय्यम निबंधक कार्यालय बंद असल्याचे दिसून आले.
खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत होते हजारो रुपयांचा महसूल बुडाला आहे नागरिक हेलपाटे घालत आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र येथील सर्व कर्मचारी संपावर असल्याने तेथील रुग्ण सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात येत आहेत
ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचारी संपावर आहेत परंतु रुग्णसेवा मात्र चालू आहे. तालुक्यातील कृषी सार्वजनिक बांधकाम निरा उजवा कालवा कार्यालय म्हैसाळ कालवा कार्यालय वन नगरपालिका लघुपाटबंधारे आधी सर्व कार्यालयातील कामकाज बंद असल्याचे दिसून आले.


0 Comments