मराठी चित्रपटसृष्टीतील मराठमोळे ज्येष्ठ सहायक अभिनेते व नाट्य अभिनेते असणारे,भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन
कोल्हापूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. भालचंद्र कुलकर्णी यांचे मराठी चित्रपटसृष्टीतील योगदान मोठे आहे,
त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. ‘झुंज तुझी माझी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’, ‘जावयाची जात’, अशा ३०० पेक्षा चित्रपटांत त्यांनी काम केले होते.
१९८४ साली आलेल्या ‘कुलस्वामिनी अंबाबाई’ या चित्रपटातील ‘चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं’ हे त्यांच्यावर चित्रित झालेले गाणे खूपच लोकप्रिय झाले होते. यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रसृष्टी पोरकी झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो.💐💐🙏


0 Comments