मोठी बातमी: २०२४ पर्यंत शिंदे गट राहणार नाही, 288 जागा भाजपच्या चिन्हावर लढवल्या जाणार?
2024च्या विधानसभा निवडणुकीत आपल्या 170 जागा निवडून येतील. पण आपण 240 जागांवर लढणार आहोत. शिंदे गटाचे 50च्यावर आमदार नाहीत, वक्तव्य प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं
भाजप प्रसिद्धी प्रमुखांच्या बैठकीत केलं. याचा व्हिडिओ पुढे आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील निशाणा साधला आहे.
एकटा भाजप महाविकास आघाडीच्या (MVA)समोर निवडणूक लढेल. कारण विधासभेच्या 288 जागा भाजपच्या चिन्हावर लढवल्या जातील, तोपर्यंत शिंदे गट टिकेल असं मला वाटत नसल्याचे पाटील म्हणाले.
भाजप राजकारणात कोणत्याही थराला जाईल. त्यांचे मित्र असो की शत्रू त्यांना नामोहरम करून त्यांची मत आपल्या बाजूला घेणे हा भाजपाचा कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे एकदिवस शिंदेंना त्यांच्या केवळ चार ते पाच ठिकाणी जागा निवडून येऊ शकतात, हे सांगितलं जाईल. कारण भाजप सातत्याने सर्वे करत आहे, असेही पाटील म्हणाले.
बावनकुळे यांचं विधान आल्यानंतर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाची लायकीच काढली आहे. उद्या भाजपवाले त्यांना पाच जागाही देतील.
हीच शिंदे गटाची लायकी आहे, अशी जोरदार हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 2014मध्ये शिवसेनेने एका जागेसाठी युती तोडली होती. स्वाभिमानासाठी युती तोडली होती. यांना मात्र तुकडे फेकले आहेत.
आयुष्यभर त्यांना तुकडे फेकले जातील. त्यांना तुकडा तोंडात चघळत बसावे लागेल. यांना कुठला आलाय स्वाभिमान? उद्या यांना भाजपवाले पाच जागाही देतील. ही यांची लायकी आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
नेमक काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे
भाजपच्या प्रसिद्धी प्रमुखांची काल बैठक पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युलाच जाहीर केला. 2024च्या विधानसभा निवडणुकीत आपल्या 170 जागा निवडून येतील. पण आपण 240 जागांवर लढणार आहोत. शिंदे गटाचे 50च्यावर आमदार नाहीत, असं बावनकुळे म्हणाले.


0 Comments