शेतकऱ्याच्या खात्यावर येणार 4000 रुपये, पाहा कोणाला मिळणार लाभ?
पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता 27 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. मात्र अजूनही काही शेतकरी असे आहेत ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत.
तुम्ही EKYC केलं असेल आणि तुम्ही लाभार्थी असाल तर चिंता करण्याचं कारण नाही.तुमच्या खात्यावर सरकारकडून हे पैसे जमा केले जाणार आहेत. तुम्ही नोंदणी करताना जर काही चुका केल्या असतील किंवा चुकीचं बँक खातं निवडलं असेल तरी सुद्धा तुमचा हप्ता येणार नाही
किंवा थांबवला जाण्याची शक्यता आहे. pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन याबाबत तपासणी करू शकता. याशिवाय तिथे टोलफ्री क्रमांक दिला आहे.
ज्या शेतकऱ्यांचे दोन हप्ते अडकले आहेत. त्यांना दोन्ही हप्त्याचे मिळून 4 हजार रुपये येणार आहेत. 12 व्या हप्त्याचे 2 आणि 13 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये येणार आहेत.
फॉर्म भरताना काही चूक झाली असेल तर ती लवकरात लवकर दुरुस्त करावी लागेल. त्यामुळे तुमच्या खात्यावर पूर्ण हप्ता जमा होईल. कोणत्याही कारणास्तव शेतकऱ्याचे नाव शासनाकडून नाकारले गेले तर तो पात्र ठरणार नाही.


0 Comments