सांगोला आर पी आय आठवले गट कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक स्वबळावर लढणार
:तालुकाध्यक्ष मा. खंडू (तात्या) सातपुते
सांगोला, दि. ३० कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत रिपाई आठवले गट हा कोणत्याही पक्षाशी युती न करता स्वतंत्रपणे १८ जागांवर निवडणूक लढविणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष खंडू सातपुते यांनी संचारशी बोलताना दिली..
आज देशात व राज्यात रिपाई आठवले गटाची युती भाजपची आहे. सध्या राज्यात भाजप शिवसेना शिंदे गट व रिपाइंची युती आहे. तालुक्याचे आमदार शिवसेना शिंदे गटाचे आहेत. परंतु ते आम्हाला कोणत्याही निवडणुकीत सहभागी करून घेत नाहीत.
त्यांना मानणारा दलित असेल, त्यांनाच उमेदवारी दिली जाते. केंद्रीयमंत्री रामदास आठवले, राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून पक्षवाढीसाठी आमचे कार्यकर्ते व पदाधिकारी प्रयत्नकरीत असतात,
त्यांचाही विचार केला पाहिजे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, खरेदी विक्री संघ, बाजार समि ती, ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाच्या चळवळीतील कार्यकर्त्यांना संधी न देता आमदार शहाजी पाटील अथवा
भाजपचे नेते त्यांच्या जवळच्या दलित कार्यकर्त्याला अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, भटक्या विमुक्त जातीच्या आरक्षित जागेवर उभे करून निवडून आणतात. तालुक्यातील ग्रामीण भागातील चळवळीतील कार्यकर्त्याला निवडणुकीत संधी दिली जात नाही.
त्यामुळे आमचा पक्ष कसा वाढणार, असा सवाल सातपुते यांनी उपस्थित केला यासाठी यापुढील होणाऱ्या निवडणुकीत जो पक्ष संधी देईल त्यांच्याबरोबर युती केली जाईल. यात आमची ताकद दाखवून देऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे.


0 Comments