google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगली- सोलापूर महामार्गावर सांगोला वळण रस्ताकरिता अधिकाऱ्यांकडून पाहणी

Breaking News

सांगली- सोलापूर महामार्गावर सांगोला वळण रस्ताकरिता अधिकाऱ्यांकडून पाहणी

 सांगली- सोलापूर महामार्गावर सांगोला वळण रस्ताकरिता अधिकाऱ्यांकडून पाहणी

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)

शहीद कामटे संघटनेच्या मागणीचा अहवाल मंजुरी करिता वरिष्ठांकडे पाठविणार:- नाईकवाडे कार्यकारी अभियंता

सांगोला( प्रतिनिधी ) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांनी आज सांगोल्यात अशोक कामटे संघटनेच्या समवेत महामार्गाच्या समस्या संदर्भात भेट देऊन तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासित केले.

 मिरज दिशेने सांगोलाकडे येणाऱ्या राज्य महामार्गाकडून  नागरिकांना, वाहनांना सांगोला वळण दिलेले नाही .त्यामुळे सर्वच वाहनांची दैनंदिन मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

 याबाबतचे निवेदन शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने सोलापूर दिल्ली येथील प्रकल्प संचालक अधिकारी  राष्ट्रीय महामार्ग, जिल्हाधिकारी, सोलापूर यांना देण्यात आले होते.

 या सर्व परिस्थितीचि पाहणी व अहवाल सादर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता पी जी नाईकवाडे यांनी सांगोल्यात प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

 सांगली, मिरज कडून सोलापूर दिशेने या मार्गावरून सांगोला शहरात प्रवेश करू इच्छिणारी वाहने अधिकृत वळण व फलक नसल्याने थेट मार्गावरून दिशेने वाहने सुसाट शहर सोडून बाहेर 7 ते 10 किलोमीटर गेल्यावर पूर्णपणे लक्षात येत आहे  शहरात येणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे 

राष्ट्रीय महामार्ग विभागा या समस्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे संबंधित विभागास निदर्शनास आणून दिले, विविध वृत्तपत्राच्या माध्यमाने याबाबत आवाज उठवल्याने  प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

त्याकरिता सूतगिरणीच्या पुढे डाव्या बाजूला माऊली पेट्रोल पंपा जवळ किंवा शेतकरी सूतगिरणीच्या वजन काट्या नजदीक अधिकृत वळण व दिशादर्शकाची सोय तात्काळ करावी अशी शहर व परिसरातील नागरिकांची मागणी यापूर्वी केली होती. याकरिता शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना प्रयत्नशील आहे . 

तरी संबंधित विभाग या संपूर्ण परिसराचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवणार असल्याचे कळविले आहे, तरी तात्काळ वळण व्यवस्था करावी अशी मागणी अशोक कामटे संघटनेने एन एच आय सोलापूर विभागीय कार्यालय  यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

 तरी या कार्यालयाने लवकरात लवकर या मार्गावर तोडगा काढणार असल्याचे शहीद अशोक कामटे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.

चौकट:-

सांगोला शहरात प्रवेश करण्यासाठी अधिकृत वळण 

सूत गिरणीच्या नजदीक मिळण्याकरिता अशोक कामटे संघटनेने  केलेल्या निवेदनानुसार व प्रत्यक्ष स्थळाची आज पाहणी केली आहे त्यास आम्ही सकारात्मक आहोत हा मार्ग विभाग सुरक्षा समिती कडून अहवाल प्राप्त होताच हा वळण मार्ग तयार करणार असल्याचे सांगितले.

 या मार्गावरील सांगोला वळण रस्ता गरजेचा असल्याचे कामटे संघटनेने वेळोवेळी निदर्शनास आणून दिले आहे, त्याचा आम्ही सकारात्मक प्रस्ताव तयार करून पुढील कार्यवाही करणार आहोत.

श्री . पी जी नाईकवाडे, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग सोलापूर

Post a Comment

0 Comments