google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 संशोधकाची हत्या, बेल्टने घोटला गळा; घरात आढळला मृतदेह

Breaking News

संशोधकाची हत्या, बेल्टने घोटला गळा; घरात आढळला मृतदेह

 संशोधकाची हत्या, बेल्टने घोटला गळा; घरात आढळला मृतदेह

कोरोना प्रतिबंधक लस शोधणाऱ्या १८ संशोधकांपैकी एक असलेल्या बोटिकोव्ह यांचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानी आढळून आला. 

रशियातील वैज्ञानिकाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एंड्री बोटिकोव्ह असं वैज्ञानिकाचे नाव असून रशियाची कोरोना प्रतिबंधक लस स्पुटनिक V तयार करण्यात त्याचं मोठं योगदान होतं. 

एंड्री बोटिकोव्हची गळा दाबून हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह गुरुवारी २ मार्च रोजी त्यांच्याच निवासस्थानी आढळून आला. पोलिसांनी या प्रकरणी एका संशियिताला अटक केली आहे.

बोटिकोव्ह हे रशियातील एक प्रसिद्ध असे वैज्ञानिक होते. त्यांनी लस तयार करण्यासाठी काम केलं होतं आणि यासाठी त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. रिपोर्टनुसार बोटिकोव्ह त्या १८ वैज्ञानिकांपैकी होते ज्यांनी २०२० मध्ये स्पुटनिक V लस विकसित केली होती.

रशियन वृत्त संस्था TASSने रशियन फेडरेशनच्या तपास समितीच्या हवाल्याने सांगितले की, गामालिया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इकॉलॉजी अँड मॅथमेटिक्सचे वरिष्ठ संशोधक म्हणून बोटिकोव्ह काम करत होते. 

त्यांचा मृतदेह गुरुवारी निवासस्थानी आढळला. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या हस्ते २०२१ मध्ये कोरोना लसीवर काम केल्याबद्दल ऑर्डर ऑफ मेरिट फॉर द फादरलँड पुरस्काराने त्यांचा गौरव केला होता.

बोटिकोव्ह यांच्या मृत्यूचा तपास केला जात आहे. चौकशी अधिकाऱ्यांनी एका २९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. एका किरकोळ वादानंतर बेल्टने बोटिकोव्ह यांचा गळा घोटण्यात आला होता. लॉ एनफोर्समेंटने यामागे दुसरं काही कारण नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, अधिक तपास केला जात आहे. आरोपीने चौकशीवेळी गुन्हा मान्य केल्याचंही सांगण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments