चमत्कारीत प्रकार... पुरुषाच्या शरीरात महिलांचे अवयव..... डॉक्टरही आश्चर्यचकित !
अपत्य होत नाही म्हणून डॉक्टरांकडे गेलेल्या पती पत्नीला वेगळाच धक्का बसला असून पतीच्या शरीरात चक्क स्त्री चे अवयव असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे आपल्या शरीरात महिलेचे अवयव असल्याची पतीला जाणीवही झाली नव्हती.
निसर्गाच्या अनेक गोष्टी या विस्मयकारक असतात. निसर्गनियमापेक्षा वेगळे काही दिसले की हा प्रकार चमत्कारीत आणि अनाकलनीय वाटतो तरी देखील अधून मधून थक्क करणारे अनेक प्रकार निसर्गात दिसत असतात.
जन्मलेल्या प्राण्यांना चार पेक्षा अधिक पाय असणे, प्राण्यांचा चेहरा माणसासारखा असणे, एका शरीराला जन्मत:च दोन डोकी असणे असे वेगवेगळे प्रकार आढळून येतात आणि मग माणसाना हा निसर्गाचा चमत्कार अथवा विसंगती वाटू लागते.
निसर्गाने स्त्री आणि पुरुष अशी स्वतंत्र निर्मिती केली असून स्त्री- पुरुषाच्या शरीर रचनेत मुलभूत फरक केलेला आहे. दोघांची अंतर्बाह्य रचना वेगळी असते आणि त्यामुळेच स्त्री आणि पुरुष ही वेगवेगळी व्यक्तिमत्व ठरतात.
या निर्मितीत जेंव्हा काही बिघाड होतो तेंव्हा तृतीयलिंगी जन्माला येतात पण वरून पुरुष आणि आतून स्त्री असा प्रकार कधी आढळून येत नाही. निसर्गात काहीही घडू शकते त्यामुळे अशी घटना देखील समोर आली असून डॉक्टरांच्या तपासणीनंतर हा एका वेगळा आणि आश्चर्यकारक प्रकार उघडकीस आला आहे.
लग्न होऊन पाच वर्षे झाली तरी एका तरुण दाम्पत्यांना मूल होत नव्हते त्यामुळे त्यांचे पाय रुग्णालयाकडे वळणे स्वाभाविक होतेच, त्यानुसार या पती पत्नींनी वैद्यकीय मदत घेण्याचा निर्णय घेतला आणि रुग्णालय गाठले. जेंव्हा डॉक्टरांनी वेगवेगळ्या तपासण्या केल्या तेंव्हा डॉक्टरांचीही बोलती बंद झाली.
पतीच्या पोटात चक्क महिलांसारखे फॅलोपियन ट्यूब, गर्भाशय आणि अंडाशय आढळून आले. महिलेच्या शरीरात असणारे हे अवयव चक्क पतीच्या शरीरात असल्याचे पाहून डॉक्टर चकित झाले आणि पती पत्नीही विस्मयाने एकमेकांकडे पहात राहिले.
विशेष म्हणजे आपल्या शरीरात महिलांचे गर्भाशय आणि अंडाशय आहे याची जराशीही जाणीव या तरुणाला कधी झाली नव्हती. उत्तर प्रदेशाच्या फरीदाबाद येथील या तरुणाची कथा ज्याला त्याला आश्चर्यचकित करीत आहे.
डॉक्टरांनी एमआरआय केल्यावर हा प्रकार आढळून आला आणि तरुणाच्या शरीरात चक्क विकसित झालेले गर्भाशय, अंडाशय आणि फॅलोपियन ट्यूब आढळून आली. तरुणाच्या शरीरात हे सगळे असले तरी त्याला आजवर याचा कधीही त्रास झालेला नव्हता.
पुरुष म्हणून आपले आयुष्य जगत असलेल्या या तीस वर्षे वयाच्या तरुणाला देखील या तपासणीनंतर वेगळेच आश्चर्य वाटू लागले. आपल्या शरीरात महिलांचे अवयव आहेत याची कसलीही जाणीव त्याला कधीही झाली नव्हती. वरून पूर्ण पुरुष असलेल्या या तरुणाच्या आतून मात्र महिलांचे महत्वाचे अवयव दिसून आले होते. डॉक्टरांच्या मते ही काही जगावेगळी घटना नाही.
पुरुषांच्या शरीरात महिलांचे अवयव आढळणे यापूर्वीही घडले आहे. सदर तरुणाला पर्सिस्टंट मुलेरियन डक्ट सिंड्रोम हा एक दुर्मिळ असणारा आजार होता आणि त्यामुळे शरीरात स्त्री आणि पुरुष अशा दोन्ही लिंगाचे अवयव विकसित होत असतात.
डॉक्टरांनी या तरुणावर शस्त्रक्रिया केली असून त्याच्या शरीरातील महिलांचे अवयव काढून टाकण्यात आले आहेत. रोबोटिक ऑपरेशन करून हे अवयव काढण्यात आले असून आता तो सामान्य जीवन जगू शकणार आहे. शस्त्रक्रिया करून दिलासा मिळाला असला तरी डॉक्टरांनी त्याला दुसरा एक धक्का दिला आहे.
या तरुणाच्या टेस्टिसमध्ये शुक्राणू तयार होऊ शकत नाहीत, त्यामुळे त्याला स्वतःचं मुलं होऊ शकत नाही. मात्र हे कुटुंब 'टेस्ट ट्यूब बेबी' च्या सहाय्याने अपत्य जन्माला घालू शकतात. अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
'देवाची करणी आणि नारळात पाणी' अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे पण सगळीच करणी काही नारळात नसते तर ती निसर्गाच्या अनेक घटकातून दिसून येते हेच या घटनेने दाखवून दिले आहे.
पुरुषाच्या शरीरात महिलांचे अवयव असणे ही बाब ज्याला त्याला आश्चर्यात टाकणारी ठरली आहे. वरून संपूर्ण शरीर पुरुषाचे असताना शरीराच्या आता मात्र महिलांचे अवयव असणे हे दुर्मिळ आणि तितकेच आश्चर्यकारक आहे त्यामुळे या घटनेचीही सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.


0 Comments