google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 चिकमहुद (ता. सांगोला) येथे मोटारसायकल संरक्षक भिंतीवर आदळून तीनजण गंभीर जखमी

Breaking News

चिकमहुद (ता. सांगोला) येथे मोटारसायकल संरक्षक भिंतीवर आदळून तीनजण गंभीर जखमी

 चिकमहुद (ता. सांगोला) येथे मोटारसायकल संरक्षक भिंतीवर आदळून तीनजण गंभीर जखमी

महुद / प्रतिनिधी चिकमहुद (ता. सांगोला) येथील महारनवरमळा येथे दि. ३ रोजी सायकाळी साडेपाचच्या सुमारास पंढरपूरहून विठ्ठलाचे दर्शन घेऊन घराकडे (मायणी) कडे निघालेल्या टू व्हीलर गाडीच्या चालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक भिंतीवर आदळून तीनजणगंभीर जखमी झाले.

शासकीय रूग्णवाहिकेची वाट न पाहता जखमींना चिकमहुद येथील पोलीस पाटील केंगार, दयानंद राक्षे, दै. पुण्यनगरीचे महुद प्रतिनिधी वैभव काटे, सनी बिचुकले, महेश बिचुकले, नवनाथ महारनवर, सोमनाथ महारनवर या युवकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र महुद येथे उपचारासाठी तत्काळ दाखल केले.

 यावेळी या प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी यांनी या रुग्णांना प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारा करिता पाठविण्यात आले. चिकमहूद येथील या सुजाण युवकाच्या मदतीमुळे या अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना वेळेत औषधोपचार मिळाल्याने त्यांच्याजीवितास होणारा धोका टाळण्यास मदत झाली. 

महुद दिघंची या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढलेले असून वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरी प्राथमिक आरोग्य केंद्र महुद येथे पूर्णवेळ अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी, अशी मागणी महूद येथील दयानंद राक्षे यांनी केली.

Post a Comment

0 Comments