अशोक कामटे संघटनेच्यावतीने शहीद दिन साजरा
सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)
भगतसिंग ,राजगुरू ,सुखदेव या तिन्ही क्रांतिवीरांची राष्ट्रनिष्ठा वाखाणण्यासारखी होती,
इंग्रज सरकारच्या जुलमी धोरणाविरुद्ध आवाज उठवणे अशा विविध गुन्ह्यात त्यांना अडकवून या तिघांनाही23 मार्च 1931 मध्ये फाशी शिक्षा सुनावली तो दुर्दैवी दिन होता. या तीन क्रांतिवीरांचे बलिदान कदापिही भारत विसरणार नसल्याचे गौरवउद्गार नीलकंठ शिंदे सर यांनी शहीद दिनानिमित्त व्यक्त केले.
शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने शहीद दिवस साजरा करण्यात आला.
सुरुवातीस स्टेशन रोड येथील संघटनेच्या तोरणा मुख्यालयात शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन दिग्विजय चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष चारुदत्त खडतरे यांनी केले. यावेळी उपस्थित देशप्रेमी नागरिकांनी शहिदांना अभिवादन केले कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम गीताने करण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक कामटे संघटनेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.


0 Comments