टेंभू विस्तारित योजनेसाठी स्व.आ.भाई गणपतराव देशमुख यांचे स्वप्न सत्यात उतरणार-
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस (टेंभू योजनेचे खरे जनक स्व. गणपतराव देशमुख)
सांगोला वार्ताहर.(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)
सध्या महाराष्ट्र विधानसभा व विधान परिषदेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे. याच दरम्यान विधानसभेच्या सभागृहामध्ये चर्चेदरम्यान राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टेंभू विस्तारित योजनेसाठी सुधारित १०९ गावे आहेत
त्यातील १५ एप्रिल पर्यंत याला मान्यता देण्यात येईल व नंतर प्रशासकीय मान्यता सुद्धा होईल. असे त्यांनी सभागृहाला सांगितले.
असे सांगत असताना महाराष्ट्र विधानसभेचे जेष्ठ सदस्य ज्यांनी विधानसभेचे सन १९६२ ते २०१९ अखेर पर्यंत महाराष्ट्र विधानसभा सभागृहाचे कामकाज ५५ वर्ष पाहिले.असे सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते तथा हरितक्रांतीचे जनक स्व. आमदार भाई गणपतराव देशमुख यांचा आवर्जून उल्लेख टेंभू विस्तारित योजनेच्या संदर्भाने सभागृहाला सांगितले.
स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे टेंभू योजनेसाठी खूप मोठे योगदान आहे.सांगोला तालुक्याचा दुष्काळी तालुक्याला पाणी मिळण्यासाठी जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी संघर्ष केला.हे आवर्जून सभागृहाला सांगितले.
या टेंभू योजनेमध्ये एकूण सात तालुके आहेत त्यामध्ये, कराड, कडेगाव, खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमंकाळ, व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला इत्यादी तालुक्याचा समावेश टेंभू योजनेमध्ये स्वर्गीय आबासाहेबांच्या प्रयत्नाने त्यावेळेस करण्यात आला.
टेंभू हे गाव कराड तालुक्यामध्ये असून तेथून बंदिस्त पाईपलाईनद्वारे व उचल पाण्याद्वारे शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे.त्यातून एक लाख १८ हजार ८५६ हेक्टर जमीन ओलिताखाली या योजनेमुळे येणार आहे.एकूण ४५० किलोमीटरची ही योजना कार्यान्वित आहे. निश्चितपणाने ही योजना सध्या प्रगतीपथावर आहे.
यानिमित्ताने एक आवर्जून सांगावेसे वाटते स्वर्गीय आबासाहेबांनी आटपाडी येथे दुष्काळी तालुक्यासाठी कायमस्वरूपी पाणी मिळावे यासाठी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त अनेक पाणी परिषदा घेतलेले आहेत हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे.
येत्या आठ ते दहा महिन्यांमध्ये टेंभू योजनेचे पाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत पोहोचणार आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहामध्ये स्वर्गीय आबासाहेबांचे टेंभू योजनेसाठी केलेले प्रयत्न याचा उल्लेख आवर्जून करण्यात आला.
तसेच त्या वेळचे तात्कालीन जलसंधारण मंत्री गिरीशजी महाजन व देवेंद्र फडणवीस यांचा त्यावेळी स्वर्गीय आबासाहेबांनी आवर्जून सत्कार केला होता याचीही आठवण सभागृहाला करून दिली. विशेषता सांगोला तालुक्यातील टेंभू योजनेमुळे नव संजीवनी मिळणार आहे.
वंचित गावांना लवकरच कायमस्वरूपी बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.शेतीच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न यामुळे निकाली निघणार आहे. स्वर्गीय आबासाहेबांची ही एक दूरदृष्टी व सांगोला तालुक्याचे भाग्यच म्हणावे लागेल.


0 Comments