सांगोला तालुक्यातील 146 चारा छावण्याचे प्रलंबित अनुदान तात्काळ मिळावे आ.भाई जयंत पाटील
(सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील छावणी अनुदान प्रकरण)
सांगोला वार्ताहर (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)
विधान परिषदेच्या सभागृहामध्ये प्रश्नोत्तराच्या चर्चेदरम्यान शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व चिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी विधान परिषदेमध्ये सांगोला तालुक्यातील १४६ व मंगळवेढा तालुक्यातील काही चारा छावण्यांच्या अनुदाना संदर्भातला प्रश्न उपस्थित केला.
तसेच सातत्याने हा पाठपुरावा सुरू असून अद्यापही कुठल्याही प्रकारचं चारा छावण्याचा अनुदान मिळणे अपेक्षित असताना दिले नाही याची खंत त्यांनी व्यक्त केली.संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सांगोला तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून परिचित आहे.
सांगोला तालुक्यामध्ये दुष्काळ हा नवीन नाही.परंतु या दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी व दोन हात करण्यासाठी तात्कालीन स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख विधानसभा सदस्य असताना २०१७/१८ ला दुष्काळाची दाहकता निर्माण झाली होती.
तात्कालीन सरकारने पशुपालन जगण्यासाठी व वाचवण्यासाठी स्थानिक पातळीवर काही स्वयंसेवी संस्थांना चारा छावण्या सुरू करण्याच्या संदर्भात परवानगी दिली होती. आणि त्याच धर्तीवर सांगोला तालुक्यासह मंगळवेढ्यामध्येही काही चारा छावण्या स्वयंसेवी संस्थांनी चालू केल्या होत्या.
गेली अनेक वर्ष झाले तरी १४६ छावणी चालकांना व मंगळवेढा तालुक्यातील काही चारा छावण्यांना सर्व कागदपत्राची पूर्तता करून सुद्धा चारा छावण्याचं उर्वरित बिले अथवा अनुदान देणे अपेक्षित असताना अजूनही दिलेलं नाही.
हाच प्रश्न विधान परिषदेचे जेष्ठ सदस्य व शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते चिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी उपस्थित केला त्यावेळेस मदत व पुनर्वसन मंत्री दादा भुसे यांनी सदर अनुदानाची रक्कम पडताळणी करून आयुक्तांच्या व कलेक्टरांच्या अहवालाने तात्काळ दिली जाईल असे सभागृहाला सुचित केले.


0 Comments