सांगोला तालुक्यावर पुन्हा कोरोनाचे संकट पुन्हा कोरोनाचा शिरकाव;
सांगोला तालुक्यावर पुन्हा कोरोनाचे संकट आले आहे. सावे येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर नागरिकावर सांगोला शहरातील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. सदर नागरिकाची प्रकृती बरी आहे. अशी माहिती सांगोला तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
कोरोना विषाणू मुळे सलग दोन वर्ष लॉक डाऊन, शासनाची नियमावली, मास्क, कोविड लसीकरण यासारख्या गोष्टीमधून सांगोला तालुका बाहेर पडला
असताना पुन्हा एकदा विषाणूच्या प्रादुर्भावाने सांगोल्यामध्ये शिरकाव केला आहे. यामुळे पुन्हा तालक्यावर कोरोना चे संकट येणार तर नाही अशीभिती आज ही नागरिकांमध्ये आहे. दरम्यान सावे येथील पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या निकटवर्तीय अर्थात संपर्कातील नागरिकांची तपासणी केली
असून यामध्ये इतर नागरिकांच्या तपासणीमध्ये कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. तरीही आरोग्य विभागाकडून संपर्कातील सर्वच नागरिकांना व कुटुंबातील नागरिकांना विलगीकरण राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.
सध्या वातावरण बदलामुळे व्हायरल इन्फेक्शन वाढल्याने सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. यातच एच थ्री एन टू आजाराचाही शिरकाव झालाअसून रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत आहे.
देशात आणि राज्यात इतर ठिकाणी कोरोनाच्या नवीन व्हायरल इन्फेक्शन मुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले असताना सांगोल्यात कोरोनाचा रुग्ण सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.तब्बल दोन वर्ष लॉक डाउन नंतर एप्रिल २०२२ रोजी ऐच्छिक मास्क असे बंधन लावण्यात आले होते.
त्यानंतर मास्कमुक्त महाराष्ट्र झाला होता. विषाणू पासून संरक्षण मिळवण्यासाठी लसीकरण घेण्याकरिता मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती.
आज ही आरोग्य विभागाकडून लसीकरण मोहीम प्रभावीपणे सुरू असूनलसीकरणापासून वंचित नागरिकांना त्याचा लाभ दिला जात आहे. तत्पूर्वी कोणत्याही किरकोळ आजारावर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घ्यावेत असेही आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
शासनाकडून कोणतीही गाईडलाईन नाही. नागरिकांनी सुरक्षितेच्या दृष्टीने कोविड लसीकरण करून घ्यावे, स्वतःहून सोशल डिस्टन्स पाळावे, मास्क वापरावा, यापूर्वी दिलेल्या शासनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन केले आहे.


0 Comments