कमलापूर गोडसेवाडी आईसर टेम्पो व दोन चाकी यांच्यात अपघात खड्डयाने घेतला युवकाचा बळी
नॅशनल हायवे १६६ लगत सांगोला शहरापासून नजीकचे गाव असणारे कमलापूर येथील नॅशनल हायवेच्या लगत कमलापूर ते गोडसेवाडी बायपास रस्ता बनला मृत्यूचा सापळा बनला आहे.
नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्याच्या गलाधन कारभारामुळे कमलापूर गावाहून जात असताना गोडसेवाडीच्या लगत बायपास या रस्त्याच्या निकृष्ट प्रतीच्या कामामुळे कमलापूर येथील हरहुन्नरी व्यक्तिमत्व युवक कार्यकर्ते,
संजय ढोले यांचा सायंकाळी ८: ४५ दरम्यान आईसर टेम्पो व दोन चाकी यांच्यात अपघात होऊन खड्डयाने घेतला बळी असे कित्येक बळी नॅशनल हायवे चे अधिकारी घेणार असा सवाल कमलापूर ग्रामस्थांच्या वतीने वाहतूक करत असताना कमलापूर येथेग्रामस्थांच्या वतीने वाहतूक करत
असताना कमलापूर येथे सांगोला तालुका औद्योगिक वसाहती केंद्र तसेच इतर गावे अजनाळे, चिनके, बलवडी, मंगेवाडी, लोटेवाडी, खवासपूर, नाझरे, वझरे, चिणके, आटपाडी, दिघंची, पिंपरी, लिगाडेवाडी, इत्यादीसाठी हा मार्ग नेहमीच वरदळीचा ठरला.
याचा परिणाम म्हणून लोक थेट नॅशनल हायवेवर चार चाकी व दोन चाकी वाहने घेऊन येतात. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून सदरचे काम प्रलंबित आहे. आतापर्यंत अनेक अपघात अक्षरशः न पाहणारे झालेले आहेत. अनेक निष्पाप लोकांचा यामध्ये बळीकाही लोकांचे संसार उध्वस्त झालेले आहेत.
छोट्या मोठ्या गाड्यांचे अक्षरशा कधी न भरून निघणारे नुकसान झाले आहे. काही जणांचे अक्षरशः हात पाय मोडलेले आहेत. या अपघातामध्ये काही लोकांचं परिवार उध्वस्त झाला आहे. नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब कमलापूर गोडसेवाडी बायपासचा प्रश्न कायमचा निकाली काढावा.
आणि अनेक असंख्य लोकांचे होणारे अपघात टाळावेत. लवकरात लवकर खड्डा दुरुस्ती करून व बायपास दुरुस्ती करून वाहतुकीसाठी खुला करावा असा असा इशारा कमलापूरचे युवा नेते बाबुराव. बी. आर. बंडगर यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.


0 Comments