google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरातील हॉटेलमध्ये खराब जेवण दिल्याने अनेकांना उलट्या व जुलाब अन्नसुरक्षा विभागाने लाच न घेता योग्य ती कारवाई करावी सर्व हॉटेल तपासावी

Breaking News

सांगोला शहरातील हॉटेलमध्ये खराब जेवण दिल्याने अनेकांना उलट्या व जुलाब अन्नसुरक्षा विभागाने लाच न घेता योग्य ती कारवाई करावी सर्व हॉटेल तपासावी

 सांगोला शहरातील हॉटेलमध्ये खराब जेवण दिल्याने अनेकांना उलट्या व जुलाब

अन्नसुरक्षा विभागाने लाच न घेता योग्य ती कारवाई करावी सर्व हॉटेल तपासावी 

सांगोला /(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज) प्रतिनिधी सांगोला तालुका हा हॉटेल व्यवसायामध्ये नावलौकिक करत आहे परंतु दुसरी बाजू पाहता ह्या हॉटेल व्यवसायकांनी रात्रीचे राहिलेले मटण व शिळी भाजी दिल्याने अनेक सांगोला तालुक्यातील नागरिकांना उलट्या व जुलाब लागल्याच्या घटना वारंवार वाढत आहे. 

त्यामुळे अशा नालायक व चुकीच्या हॉटेल मालकाविरोधात लवकरच अन्न व सुरक्षा विभागाकडून कारवाई करण्यात येईल ज्या लोकांना उलट्या व जुलाब लागलेले आहेत . 

त्यांनी अशा हॉटेल व्यवसायकांची नावे अन्न व सुरक्षा यंत्रणे कडे दिलेली आहेत. या हॉटेलची लवकरात लवकर चौकशी होऊन अशाखराब जेवण देणाऱ्या हॉटेल मालकाविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी सांगोला शहरातील व तालुक्यातील नागरिकाकडून करण्यात येत आहे.

येणाऱ्या कालावधीमध्ये अशा चुकीच्या पद्धतीने जेवण बनवणाच्या हॉट ेल चालकाविरोधात कारवाई न झाल्यास ज्या ग्राहकांना उलट्या व जुलाब झालेले आहेत त्या ग्राहकांच्या वतीने अन्न व सुरक्षा विभागाकडे भव्य निदर्शन करण्यात येणार आहेत.

सांगोला शहरातील हॉटेल चालक विविध प्रकारे अफाट बिल लावत आहेत त्यामध्ये लाईट बिल बसण्याची जागा टेबलचा खर्च खुर्च्याचा खर्चत्यांच्या हॉटेल समोर केलेली रोषणाई असा विविध खर्च ते त्या बिलामध्ये ऍड करत असतात अशी परिस्थिती असताना सुद्धा हे चुकीच्या पद्धतीने नागरिकांना जेवण देत आहेत

 त्यामुळे सांगोला शहरातील चुकीच्या पद्धतीने व शिळे अन्न देणाऱ्या तसेच खराब जेवण देणाऱ्या हॉटेलच्या लोकांनी याची खबरदारी घ्यावी अन्यथा पुराव्यानिशी येणाऱ्या काळात उलट्या व जुलाब झालेले ग्राहक बातमीच्या स्वरूपे तुम्हाला योग्य ते धडा शिकवून तुमचे हॉटेल बंद पडतील असा इशारा उलटी व जुलाब लागलेल्या ग्राहकाकडून देण्यात आला आहे.

सांगोला शहरांमध्ये अनेक वेळा हॉटेलमध्ये जेवण केल्याने अनेकग्राहक आजारी पडलेले आहेत. अशा बातम्या वर्तमानपत्रांमध्ये येत असताना सुद्धा अनुभव सुरक्षा विभागाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही याचाच सहारा घेऊन हॉटेल मालकांच्या कडून चुकीच्या पद्धतीने जेवण देऊन आज तगायत हजारो नागरिकांना उलट्या व जुलाब झालेले आहेत 

त्यामुळे अन्न व सुरक्षा विभागाने सांगोला शहरातील व तालुक्यातील हॉटेलमध्ये अचानक भेटी देऊन तेथील अन स्वतः खाऊन तपासणी करावी तेथे त्यांनी लाच घेऊ नये कारण हा तालुक्याच्या नागरिकांच्या दृष्टीने जेव्हा भावाचा विषय आहे. लाच घेऊन त्यांना थारा दिल्यामुळे असे चुकीचे पद्धतीने हॉटेल मालक मनमानी करत आहेत.

Post a Comment

0 Comments