जत मधील माजी नगरसेवक विजय ताड यांचे खुनाचा उलगडा, ४ आरोपी जेरबंद एक फरार
सदर आरोपीचे नावे अशी,बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण वय २७ रा समर्थ कॉलनी, जत, ता जत. जि सांगली,निकेश उर्फ दाद्या दिनकर मदने वय २४ रा. मौजे डिग्रज ता. मिरज जि. सांगली,आकाश सुधाकर व्हनखंडे वय २४ रा. के एम हायस्कुल जवळ सातारा फाटा,
जत ता. जत जि.सांगली,किरण विठ्ठल चव्हाण वय २७ रा. आर आर कॉलेज जवळ, जत ता. जत जि. सांगली,उमेश सावंत रा.जत यांनी खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.
अधिक माहिती अशी की,
दिनांक १७.०३.२०२३ रोजी दुपारी १.४५ वा.चे सुमारास यातील मयत विजय शिवाजी ताड वय ४२ रा. ताड मळा, जत ता. जत जि. सांगली हे त्यांचे इनोव्हा गाडी क्र. एम. एच. १० सी.एन.०००२ या गाडीने त्यांच्या मुलांना शाळेतून घरी आणणेसाठी जात
असताना बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण व त्याचे साथीदार यांनी मोटरसायकल वरुन येवुन अज्ञात कारणावरुन मयत यांचेवर पिस्तुलाने गोळीबार करुन अल्फोन्सो शाळेजवळ मोकळया मैदानात त्याचे डोके दगडाने ठेचून त्यांचा खून केला होता.
मा.पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांना जत पोलीस ठाणे कडील मयत विजय शिवाजी ताड यांच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्था. गु.अ. शाखा यांनी गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, सपोनि संदीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर अशी वेगवेगळी तीन पथके तयार करून गुन्हा उघडकीस आणणेबाबत तयार केले होते.
त्याप्रमाणे वरील सर्व पथकांनी गुन्हा घडले ठिकाणी भेट देऊन गुन्हयाचा तपास चालू केला. या गुन्हयाच्या अनुषंगाने सपोनि प्रशांत निशानदार यांनी गोपनीय बातमीदाराकडुन व पोना संदीप नलावडे, प्रकाश पाटील यांनी तांत्रिक माहिती वरुन सदरचा गुन्हा हा बबलु उर्फ संदीप शंकर चव्हाण व त्याचे साथीदार यांनी केला असल्याबाबत माहिती मिळाली.
या गुन्हयातील संशयित इसम हे गोकाक, कर्नाटक राज्य या ठिकाणी असल्याबाबत माहिती मिळाल्याने सपोनि प्रशांत निशानदार व त्यांचे पथक गोकाक, कर्नाटक राज्य या ठिकाणी दाखल होऊन आरोपीचा शोध सुरु केला.
गोपनीय बातमीदाराकडुन सदरचे आरोपी हे गोकाक एस टी स्टैंड परीसरात असल्याचे समजल्याने वरील पथकाने सापळा लावुन पंचासमक्ष त्या चौघांना गोकाक एस टी स्टैंड परीसरात ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी आपली नावे बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण वय २७ रा समर्थ कॉलनी,
जत. ता जत, जि सांगली ,निकेश उर्फ दाया दिनकर मदने वय २४ रा. मौजे डिग्रज ता. मिरज, जि. सांगली,आकाश सुधाकर व्हनखंडे वय २४ रा. के एम हायस्कुल जवळ सातारा फाटा, जत ता. जत, जि. सांगली,किरण विठ्ठल चव्हाण वय २७ रा. आर आर कॉलेज जवळ, जत ता. जत, जि. सांगली अशी सागितली.
जत येथील अल्फोन्सो शाळेजवळ मोकळया मैदानात मयत विजय शिवाजी ताड यांचे खुनाच्या गुन्हयाचे अनुषंगाने कौशल्यपूर्ण तपास केला असता, बबलू उर्फ संदीप चव्हाण याने सांगितले की, मयत नामे विजय शिवाजी ताड यांचा खुन
त्याने व निकेश उर्फ दाद्या मदने, आकाश व्हनखंडे, किरण चव्हाण असे मिळुन उमेश सावंत रा. जत याचे सांगणेवरून केला असल्याचे कबुल केले.पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी सदर गुन्हयाचे तपास कामी चौघांना अटक केले असुन पुढील गुन्हयाचा तपास सुरु आहे.
सराईत गुन्हेगार
1)आरोपी नावे बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण वय २७ रा समर्थ कॉलनी, जत. ता जत. जि सांगली हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचेवर जत पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्न, मारामारी, यासारखे गंभीर स्वरुपाचे ६ गुन्हे आहेत. त्याचेवर सन २०१८ मध्ये यापूर्वी एमपीडीए अतंर्गत एक वर्षाकरीता स्थानबध्द कारवाई करण्यात आली आहे.
2)निकेश उर्फ दाया दिनकर मदने वय २४ रा. मौजे डिग्रज ता. मिरज जि. सांगली हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचेवर यापुर्वी विश्रामबाग, सांगली ग्रामीण, मिरज ग्रामीण, जत या पोलीस ठाणे मध्ये
खंडणी, दरोडा, गंभीर दुखापत, मारामारी यासारखे ४ गुन्हे दाखल आहेत.
3)आकाश सुधाकर व्हनखंडे वय २४ रा. के एम हायस्कुल जवळ सातारा फाटा, जत ता. जत जि.सांगली हा रेकॉर्डवरील आरोपी असुन याचेवर जत पोलीस ठाणे येथे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.
या गुन्हयातील परांगदा आरोपी व सुत्रधार उमेश सावंत याचा शोध सुरु असुन गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली करीत आहेत.
मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कारवाई करणारे अधिकारी आणि अमलदार उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांचे मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे ,सपोनि प्रशांत निशानदार, सपोनि संदीप शिंदे,पोउनि विशाल येळेकर संदीप नलवडे, प्रकाश पाटील, चेतन महाजन, प्रशांत माळी, ऋतुराज होळकर, विनायक सुतार, नागेश खरात, दिपक गायकवाड,
सुनिल लोखंडे, कुबेर खोत, सचिन धोत्रे, राजु मुळे, जितेंद्र जाधव, आमसिध्दा खोत, संदीप गुरव, अनिल कोळेकर, सागर लवटे, बिरोबा नरळे, सागर टिगरे, अच्युत सुर्यवंशी, राजु शिरोळर, संजय कांबळे, निलेश कदम, राहुल जाधव, सोहेल कार्तीयांनी अमोल ऐदाळे, वैभव पाटील, उदयसिंह माळी,निसार मुलाणी यांनी करवाई केली.


0 Comments