धक्कादायक घटना..साताऱ्यात शिंदे गटाच्या नेत्याने केला गोळीबार; मंत्री शंभूराज देसाईंचा कार्यकर्ता ठार
सातारा जिल्ह्यामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. साताऱ्यातील पाटण तालुक्यात मोरणा खोऱ्यात गोळीबाराचा थरार घडला
असून यामध्ये दोन जण ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ठाण्यातील शिंदे गटाचा पदाधिकाऱ्याने हा गोळीबार केल्याची माहिती पुढे आली आहे. ठार झालेल्यांमध्ये एक व्यक्ती हा मंत्री शंभूराजे देसाई यांचा कार्यकर्ता आहे.
ठाणे महानगरपालिकेचा माजी नगरसेवक मदन कदम यांना पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतलं आहे. कदम हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये आहेत. ते शिवसेनेचे माजी संपर्क प्रमुख देखील राहिलेले असून मुळचे पाटण तालुक्यातील आहेत. या घटनेनंतर साताऱ्यात तणाव परिस्थिती निर्माण झाली आहे
पवनचक्कीच्या जुन्या व्यवहाराच्या वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मदन कदम हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस फौजफाटा घटनास्थळाकडे रवाना झाला आहे.


0 Comments