google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल तहसीलदार मा. अभिजीत पाटील

Breaking News

सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल तहसीलदार मा. अभिजीत पाटील

 सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल तहसीलदार मा. अभिजीत पाटील 



(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)सांगोला :- अखेर १८ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजल्याने सत्ताधारी शेकापसह विरोधी पक्षाचे नेतेमंडळी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

 येत्या सोमवार, दि. २७ मार्च ते सोमवार, दि. ३ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत तर शुक्रवार, दि. २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

 सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत १५ सप्टेंबर २०२१ रोजी संपली होती. त्यानंतर २३ ऑक्टोबरपर्यंत विद्यमान संचालक मंडळास मुदतवाढ दिली होती. त्यानंतर बाजार समितीकडून प्रारूप याद्या प्रसिद्ध केल्या होत्या. 

दरम्यान, त्यानंतरहीसंचालक मंडळाला मुदतवाढ मिळाल्याने तब्बल १८ महिने निवडणूक लांबणीवर पडली होती. त्यामुळे बाजार समितीची निवडणूक कधी जाहीर होणार, याकडे सत्ताधारी शेकापसह विरोधकांचे लक्ष लागले होते.

 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाल्यामुळे राजकीय पक्षाच्या हालचाली वाढल्या आहेत. 

संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी येत्या सोमवार, २७ मार्च ते सोमवार, ३ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असणार आहे. तर बुधवार, ५ एप्रिल रोजी अर्जाची छाननी होऊन 

गुरुवार, ६ एप्रिल रोजी उमेदवारी याद्या प्रसिद्ध केल्याजागांसाठी येत्या सोमवार, २७ मार्च ते सोमवार, ३ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असणार आहे. तर बुधवार, ५ एप्रिल रोजी अर्जाची छाननी होऊन गुरुवार, ६ एप्रिल रोजी उमेदवारी याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

 तर गुरुवार, ६ ते गुरुवार, २० एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. शुक्रवार, २१ एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.

 तर शुक्रवार, २८ एप्रिल रोजी मतदान होऊन मतदान झाल्यापासून तीन दिवसांमध्ये मतमोजणी होणार आहे.

Post a Comment

0 Comments