google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्षाची पंचायत समिती बचत भवन, सांगोला येथे उद्या महत्त्वपूर्ण बैठक आयोजित

Breaking News

सांगोला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्षाची पंचायत समिती बचत भवन, सांगोला येथे उद्या महत्त्वपूर्ण बैठक आयोजित

सांगोला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)

पक्षाची पंचायत समिती बचत भवन, सांगोला येथे  उद्या महत्त्वपूर्ण बैठक आयोजित

सांगोला / प्रतिनिधी:(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) सांगोला तालुका कार्यकारणीची महत्वपूर्ण बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री भारत सरकार व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. राजाभाऊ सरवदे यांच्या आदेशानुसार रविवार 

दिनांक २६/०३/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता पंचायत समिती बचत भवन, सांगोला येथे आयोजित केलेली आहे.

 या बैठकीसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जितेंद्र बनसोडे (पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस), मा.चंद्रकांत वाघमारे (पश्चिम महाराष्ट्र सचिव तथा पक्ष निरिक्षक सांगोला तालुका), बैठकीचे अध्यक्ष खंडू (तात्या) सातपुते

(सांगोला तालुका अध्यक्ष), मा. सोमनाथ भोसले (सोलापूर जिल्हाध्यक्ष), श्यामसुंदर (रवि) गायकवाड (सोलापूर जिल्हा सरचिटणीस) या मार्गदर्शनाखाली तसेच सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष विक्रम दादा शेळके, मातंग आघाडीचे नेते मा. दामोदर साठे यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित केली आहे.

या बैठकीचे विषय 

१) तालुक्यामध्ये पक्षाचे क्रियाशिल सभासद संख्या वाढविणे संदर्भात चर्चा व विनीमय करणे. 

२) आगामी बाजार समिती. न.पा. व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक संदर्भात रणनिती ठरविणेबाबत चर्चा करणे. जादी विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

 तरी या बैठकीला जिल्हा कार्यकारणी, तालुका कार्यकारणी, युवक आधाडी, मातंग आघाडी, होलार आघाडी, सर्व आघाडीचे पदाधिकारी यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे. 

असे आवाहन आरपीआय सांगोला तालुका सरचिटणीस मा. सुर आरपीआय युवक आघाडी तालुकाध्यक्ष सौदागर सावंत यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments