सांगोला तालुक्यातील जलजीवन मिशनचे काम निकृष्ट दर्जाचे (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)
सांगोला:- केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून खवासपुर गावातील सुरु असलेल्या जवळपास पावणे दोन कोटी रुपये किंमतीच्या कामात वापरण्यात
येणाऱ्या पाईप अतिशय कमी दर्जाची असुन ती पाईप फिनोलेक्स, किंवा जैन अशा नामवंत कंपन्यांचीच वापरावी अशी सर्व ग्रामस्थ व नागरिकांची मागणी आहे
परंतु तशी मागणी असताना पाणी पुरवठा अधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसभा घेऊन संबंधित कामाची सविस्तर चर्चा ग्रामस्थांशी करुनच काम सुरू करावे, अशी मागणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा
जिल्हा परिषद सोलापूर, गटविकास अधिकारी पंचायत समिती सांगोला यांचेकडे केली असताना संबंधित ठेकेदार हे काम घाई गडबड करत असुन याच कमी दर्जाचे पाईप दीड किलोमीटर अंतरावर वेगवेगळ्या कंपनीच्या पाईप पुरून टाकल्या आहेत.
वास्तविक अगोदर झालेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेतून गावातील ९५ टक्के वस्त्यांवर पाणी पुरवठा सुरू आहे नवीन टाकी अगोदर बांधून मगच वितरीका टाकणं अपेक्षित असताना चुकीच्या पद्धतीने व कमी दर्जाचे साहित्य वापरत असलेल्या ठेकेदाराला व त्यांना पाठिशी घालणाऱ्या बद्दल नागरिक रोष व्यक्त करत आहेत
अनेकवेळा अंदाजपत्रक मागीतले असता ते दिले जात नाही पाईपचा टेस्ट रिपोर्ट मागीतला तर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही टेस्ट करा अशी भाषा पाणी पुरवठा अधिकारी नागरिकांना वापरतात.
गेल्या काही दिवसांत रस्ते, शाळा बांधकाम अशी अनेक निकृष्ट दर्जाची कामे उघड झाली परंतु आता कोणत्याही परिस्थितीत निकृष्ट दर्जाचे काम होऊ देणार नसल्याचा पवित्रा नागरीकांनी घेतला आहे.


0 Comments