google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला समग्र शिक्षा अंतर्गत अखर्चित निधी ३१ मार्च अखेर तात्काळ खर्च करण्याच्या सूचना अधिकारी डी. के. वाळवेकर

Breaking News

सांगोला समग्र शिक्षा अंतर्गत अखर्चित निधी ३१ मार्च अखेर तात्काळ खर्च करण्याच्या सूचना अधिकारी डी. के. वाळवेकर

 सांगोला समग्र शिक्षा अंतर्गत अखर्चित निधी ३१ मार्च अखेर तात्काळ खर्च करण्याच्या सूचना अधिकारी डी. के. वाळवेकर

निधी खर्च करण्याचे शिक्षण विभागापुढे  आव्हान

सांगोला:- (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज) समग्र शिक्षा अंतर्गत अखर्चित निधी ३१ मार्च अखेर तात्काळ खर्च करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

 धक्कादायक बाब म्हणजे, चालू शैक्षणिक वर्ष संपण्यास २० ते २५ दिवस शिल्लक राहिले असताना तब्बल २ कोटी ६३ लाख ६९ हजार ५८५ रुपयांचा निधी अखर्चित असल्याचे उघड झाले आहे. 

समग्र शिक्षा अंतर्गत अखर्चित निधी तात्काळ खर्च करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियानाचे लेखा अधिकारी डी. के. वाळवेकर यांनी दिल्याने निधी खर्च करण्याचे शिक्षण विभागापुढे आव्हान निर्माण झाले आहे.

सर्व शिक्षा अभियान, माध्यमिक शिक्षण अभियान यांचे एकत्रीकरण करून देशातील सर्व शाळांसाठी समग्र शिक्षण अभियान सुरु करण्यात आले 

असून या समग्र शिक्षा अभियनाच्या माध्यमातून दरवर्षी शाळांना अनुदान वितरीत करण्यात येते. समग्र शिक्षा अंतर्गत जिल्हास्तरावरुन तालुकास्तरावर पी. एफ. एम. एस. विभागापुढे आहे. प्रणालीद्वारे गणवेश अनुदान, शाळा अनुदान, समावेशित शिक्षण व बांधकाम या उपक्रमांचानिधी वर्ग करण्यात आला आहे. 

दरम्यान जिल्हा स्तरावर २४ मार्च अखेर पी. एफ. एम. एस. प्रणालीवरून आढावा घेतला असता यात धक्कादायक बाब समोर आला आहे. तब्बल २ कोटी ६३ लाख ६९ हजार ५८५ रुपयांचा निधी अखर्चित असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

विशेष म्हणजे चालू शैक्षणिक वर्ष संपण्यास फक्त २० ते २५ दिवसांचा कालावधी शिल्लक असताना तालुका निहाय अखर्चित निधी पुढीलप्रमाणे, अक्कलकोट २८ लाख २ हजार २४१ रुपये, बार्शी २४ लाख १२ हजार ९३० रुपये, करमाळा १६ लाख २३ हजार ६८२ रुपये, 

माढा २९ब्लाख ४७ हजार८१३ रुपये, माळशिरस २३ लाख १८ हजार २८१ रुपये, मंगळवेढा १३ लाख ५४ हजार ९५० रुपये, मोहोळ ६६ लाख २९ हजार ६४७ रुपये, पंढरपूर १४ लाख ८३ हजार ५०० रुपये, सांगोला २४ लाख ९० हजार ४६० रुपये, 

उ. सोलापूर ६ लाख ६४ हजार ७९०, द सोलापूर १६ लाख ४१ हजार २९१ रुपये असा एकूण २ कोटी ६३ लाख ६९ हजार ५८५ रुपयांचा निधी अखर्चित राहिला आहे. सदर अखर्चित रक्कमेचा तात्काळ विनियोग करून शाळांना देय असणाऱ्या रक्कमा तात्काळ अदा करण्याच्या सूचना

 जिल्हा शिक्षण विभागाने जिल्ह्यातील हा निधी खर्च करण्याचे आव्हान शिक्षण गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. तसेच मार्च २०२३ मध्ये पी. एफ. एम. एस. प्रणालीवर सर्व शासकिय विभागाचा अतिरिक्त कामाचा ताण येत 

असल्याने सदर प्रणाली संथ गतीने चालण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व अखर्चित रक्कमेचा विनियोग तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या असून संबंधित शाळाना दिलेल्या मुदतीत निधी न मिळाल्यास आणि भविष्यात शाळाच्या तक्रारी 

निर्माण झाल्यास त्यांची जबाबदारी त्या त्या स्तरावरील कार्यालयाचीमार्च २०२३ मध्ये पी. एफ. एम. एस. प्रणालीवर सर्व शासकिय विभागाचा अतिरिक्त कामाचा ताण येत असल्याने सदर प्रणाली संथ गतीने चालण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

त्यामुळे सर्व अखर्चित रक्कमेचा विनियोग तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या असून संबंधित शाळाना दिलेल्या मुदतीत निधी न मिळाल्यास आणि भविष्यात शाळाच्या तक्रारी निर्माण झाल्यास त्यांची जबाबदारी त्या त्या स्तरावरील कार्यालयाची राहील यांची असेही आदेशात नमूद केले आहे.

Post a Comment

0 Comments