धक्कादायक! मंगळवेढ्यात एका शेतकऱ्याने रहात्या घराच्या छताच्या लाकडी वास्याला दोरीचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या
मंगळवेढा तालुक्यातील एका शेतकऱ्याने रहात्या घराच्या छताच्या लाकडी वास्याला दोरीचे सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
वसंत शिवाजी मोरे (वय.50 रा.आंधळगाव ता.मंगळवेढा) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.याप्रकरणी मयताचा भाऊ नामदेव शिवाजी मोरे यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, काल शुक्रवारी दि.24 मार्च रोजी सायंकाळी 5.45 च्या सुमारास फिर्यादीचा भाऊ वसंत शिवाजी मोरे याने कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन त्याच्या रहाते घराचे छताचे लाकडी वास्याला दोरीचे सहाय्याने गळफास घेवुन मयत झाला आहे.
त्याला ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे उपचाराकरीता घेवुन गेले असता तेथील डॉक्टरांनी तपासुन तो मयत झाला असल्याचे सांगितले.या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.


0 Comments