३१ मार्चपर्यंत बँकां सुरु राहणार, रविवारीही होणार काम; रिझर्व्ह बँकेचा आदेश
मुंबई : आर्थिक वर्ष २०२२-२३ आता अंतिम टप्प्यात आले असून केवळ ९ दिवसांनी हे आर्थिक वर्ष आपला निरोप घेणार आहे. सरकारी विभाग, मंत्रालयांसह देशातील बहुतेक कार्यालये, संस्था इत्यादींमध्ये वार्षिक क्लोजिंगची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
आर्थिक वर्षाची समाप्ती ही बँकांसाठी वर्षातील सर्वात मोठी घटना आहे. यंदाही देशातील सरकारी, निमसरकारी, खासगी, सहकारी बँका यासारख्या बँकिंग संस्था जोमाने काम करत आहेत. या पार्श्वभूमीवर आरबीआयकडून मोठी बातमी आली आहे.
बँकांच्या सर्व शाखा ३१ मार्चपर्यंत रविवारी सुरू राहतील. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) बँकांना ३१ मार्चपर्यंत शाखा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आर्थिक वर्ष २०२२-२३ या महिन्याच्या ३१ तारखेला संपणार आहे.
म्हणूनच देशाच्या केंद्रीय बँकेने बँकांना या महिन्यातील सरकारशी संबंधित सर्व व्यवहार ३१ मार्चपर्यंत निकाली काढण्यास सांगितले आहे. आणि यासाठी त्यांनी बँकांना विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे.


0 Comments