आयुष्यामध्ये आई वडील म्हणजे
मुलांच्या आयुष्यातील मौल्यवान दागिना डॉ परेश खंडागळे
आई आणि वडील म्हणजे मुलांच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा सर्वप्रथम मौल्यवान दागिना आहे. त्यांच्यामुळेच मुले आयुष्यामध्ये विविध पदावर पोहोचत असतात.
त्यांनी केलेले अपार कष्ट, त्यांनी केलेले मार्गदर्शन हे सर्वप्रथम त्या मुलांच्या आयुष्यामध्ये महत्वाचे ठरते. त्यानुसार दैनंदिन जीवनामध्ये मुलं घडत असतात. अशी माहिती सांगोला शहरातील आनंद हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ परेश खंडागळे यांच्याकडून देण्यात आली.
आई-वडिलांच्या चाळीसाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये बोलत होते. सौ महानंदा खंडागळे व श्री लक्ष्मणराव तुकाराम खंडागळे यांच्या 40 व्या लग्न वाढदिवसानिमित्त सोमवारी खंडागळे परिवाराच्या वतीने आईच्या वजनाएवढी साखर आणि वडिलांच्या वजना एवढ्या वह्या देऊन वाढदिवस सामाजिक बांधील की जोपासत साजरा करण्यात आला.
डॉ परेश खंडागळे हे नेहमीच सामाजिक बांधिलकी म्हणून विविध उपक्रम घेत असतात. आई-वडिलांच्या चाळीसाव्या लग्न वाढदिवसा निमित्त त्यांनी समाज हिताचा विचार लक्षात घेऊन गोरगरीब, वंचित विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटप केल्या.
तसेच साखर वाटप करण्यात आली. ते नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहून गोरगरिबांना मदत करत असतात. सांगोला तालुक्यामध्ये सुप्रसिद्ध म्हणून डॉ परेश खंडागळे हे परिचित आहेत


0 Comments