google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला कोळा येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी माजी आम. दिपक साळुंखे पाटील यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित

Breaking News

सांगोला कोळा येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी माजी आम. दिपक साळुंखे पाटील यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित

सांगोला कोळा येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी माजी आम. दिपक साळुंखे पाटील

यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित

दीपक साळुंखे यांचा सत्कार

नेहमीच सामान्य लोकांच्या हितासाठी आणि प्रश्नासाठी अहोरात्र झटणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष,

माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांची नुकतीच पेट्रोनमधून रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

रयत सारख्या लोकप्रिय शिक्षण संस्थेत आपल्या हक्काचा माणूस नियुक्त झाल्याबद्दल कोळा ता. सांगोला येथे रविवार दि ५ मार्च रोजी सायं. ५ वा. अर्जुन चौक, कोळा येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी माजी आम. दिपक साळुंखे पाटील यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित केला आहे.

संपूर्ण कोळा आणि तालुक्याचे शक्तीपीठ असलेल्या१०८ रुद्रपशुपती कोळेकर महास्वामीजी यांच्याहस्ते दिपक साळुंखे पाटील यांचा हा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सत्कार समारंभास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या महिला अध्यक्षा स्वाती शिंदे पवार व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सल्लागार लहू कांबळे हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.

कोळा आणि साळुंखे पाटील परिवार हे सबंध नेहमीच सलोख्याचे आणि सख्याचे राहिले आहेत. कोळा परिसरातील नागरिकांच्या सुखदुःखात साळुंखे पाटील परिवार नेहमीच प्रकर्षांने सहभागी असतो.

 त्यामुळे या परिसराने नेहमीच आपल्या कुटुंबातील एक सदस्ययाच नात्याने मा आम. दिपक साळुंखे पाटील यांच्यावर निरपेक्ष भावनेने प्रेम केले आहे. याच प्रेमातून रविवारी हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या नागरी सत्कार समारंभास कोळा आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन

आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments