सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचा 71 वा वर्धापन दिन नाझरा विद्यामंदिर मध्ये साजरा
नाझरा( वार्ताहर):- सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचा 71 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात नाझरा विद्यामंदिर प्रशाला, जुनिअर कॉलेज व इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये साजरा करण्यात आला.
यावेळी सर्वप्रथम कै. गुरुवर्य बापूसाहेब सबके यांच्या तैलचित्रास प्राचार्य अमोल गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला.त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक चारुदत्त जगताप यांनी केले.यावेळी प्रशालेतील मुलींनी राष्ट्रगीत,ध्वजगीत, संविधान व राज्यगीत सादर केले. प्रशालेतील शिक्षक दीपक शिंदे यांनी संस्थेने 71 वर्षात केलेल्या उत्कर्ष कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला.
या कार्यक्रमास इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सिमरन काझी, पर्यवेक्षक मधुकर धायगुडे यांच्यासह प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले.


0 Comments