सांगोला : शेअर मार्केटमधुन 1 करोड रु प्रॉफीट काढुन देण्याच्या बहाण्याने फसवणुक
शेअर मार्केट मुळे 71 लाख 52 हजार 400 रु गंडा !
सांगोला /प्रतिनिधी शेअर मार्केट मधून एक करोड रुपये प्रॉफिट मिळवून देतो या बहाण्याने एकाची 71 लाख 52 हजार 400 रुपये आला फसवणूक झाल्याने सांगोला पोलीस स्टेशनमध्ये शेअर मार्केट एजंट विरोधात सायबर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सचिन अशोक दुगेश्वर वय: 26, धंदा दुकानदार, मोन, 8888465575, रा. यश नगर, डोंबे हॉस्पीटल जवळ, सांगोला ता. सांगोला सध्या सांगोला पोलीस ठाणे येथे समक्ष हजर राहुन जबाब देतो की.
माझे कडलास नाका, अमर कॉम्प्लेक्स, सांगोला येथे श्री विश्वकर्मा एंटरप्रायजेस नावाचे दुकान आहे, माझे मुळ गाव सनेडीया, ता. बडीरिया, जि. नागोर, राजस्थान आहे. परंतु माझा जन्म होण्यापुर्वी पासुन आईवडील सांगोला येथेच राहणेस आहेत. मोबाईलवर कॉल
आला व मुंबईच्या शाईन रिसर्च कंपनीचा अॅडव्हायजर बोलत असल्याचे सांगीतले. त्यानी मला शेअर मार्केटमध्ये 10,000/- रु गुंतवल्यास चांगला फायदा काढून देतो असे सांगुन डिमॅट खाते उघडुन घेण्यास सांगीतले. मी त्याना एचडीएफसी व एसबीआय डिमेंटबाबत विचारले असता बोकरद्वारे उघडु असे म्हणुन त्यानी मला 8719050218 हा ब्रोकरचा नंबर दिला.
सत्येंद्र कुमार गुप्ता असे नाव असलेचे सांगीतले. त्यांनी मला या Neostox कंपनीचे डिमॅट खाते काढून दिले व त्यानी सांगतलेप्रमाणे 10,000/- रु नवीन डिमेंट खात्यावर दि. 22/09/2022 रोजी 11:45वा पे टीम या बॅन्केच्या खात्यावरून पाठविली.
त्यानी मला सदर खात्याचा लॉग इन आयडी 8719050218 तसेच पासवर्ड 2580 असा दिला होता. त्याकरीता मी आधार कार्ड, बॅन्क स्टेटमेंट व पॅनकार्ड दिलेले होते. त्यानंतर तेंव्हापासून डिमेंट खात्यावर व्यवहार चालु झाले. त्याच दिवशी अँडव्हायजर मोनं. 7415248686 यानी ट्रेड केल्यानंतर सुमारे 8 ते 9 हजार रुपये फायदा झाल्याचे मला दिसुन आले.
मी Neostox कंपनीचे डिमॅट खात्यावर भरलेल्या पैशाचा ट्रेडींग चालु राहीला. त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी दि.. 22/09/2022 रोजी 5000/-, दि. 23/09/2022 रोजी 20,000/-, दि. 24/09/2022 रोजी 40,000/- , दि. 26/09/2022 रोजी 1,00,000/- बॅन्क ऑफ इंडीयाच्या खात्यावरून डिमॅट खात्यावर भरले.
दि. 26/09/2022 रोजी 15,000/- रु पटीएम बॅन्केच्या खात्यावरुन तसेच दि. 26/09/2022 रोजी स्टेट बॅन्क ऑफ इंडीयाच्या खात्यावरुन 90,000/- असे एकूण 2,70,000/- रु डिमॅट खात्यावर पाठविले. त्यानंतर अॅडव्हायजर मोनं. 7415248686 यानी त्यांचे नाव माही
शर्मा असे सांगुन ते स्वतः माझे खात्याचा पासवर्ड व युजर आयडी वापरून अकॉटवरून ट्रेडींग करत होते. दरम्यानच्या काळात कधी लॉस तर कधी प्रॉफीट करुन दाखवत होते. त्यानी सदर व्यवहारातुन मला 500000/- प्राफीट करुन दाखवला होता.दि मी जे Neostox हे अँप वापर करत होतो,
या अॅपला वरील लोकांचे मेल आयडी टच केलेले होते ते -1)comextrade2006@gmail.com, 2) vobhoregoswami326@gmail.com, 3) palashbabele 9893@gmail.com, आणि मोबाइल नंबर 8602144600 असे आहेत, आतापर्यंत मी वरील रिसर्चर,
अँडव्हायजर आणि ब्रोकर याना एकुण 59,08,400 /- रु हवालामार्फत आणि 15,66,000/- रु ऑनलाईन असे एकुण 74,74,400 इतकी रक्कम दिलेली असुन त्यापैकी मला त्यानी आजपावेतो हवालामार्फत 2,00,000/- आणि ऑनलाईन 1,22,000 असे एकुण 3,22,000/- इतकी रक्कम परत दिलेली आहे, त्यामुळे माझी एकुण
71,52,400/- रु शेअर मार्केटमधुन 1 करोड रु प्रॉफीट काढुन देण्याच्या बहाण्याने फसवणुक केली आहे, म्हणून माझी मोन- 8719050218 धारक ब्रोकर सत्येंद्रकुमार गुप्ता याच्या विरुध्द तक्रार आहे मी अर्ज दिल्यानंतर सायबर पोलीस ठाणे यांच्याकडुन अभिप्रय घेवुन सदर गुन्ह्याची मी फिर्याद देणेस आलेने विलंब झालेला आहे.


0 Comments