सांगोला तालुक्यामध्ये सुद्धा काँग्रेसला मानणारी जनता आहे जनतेला भाजप नको आहे;
सांगोला तालुक्यात काँग्रेसच्या विचाराला चांगले दिवस येतीलः काँग्रेसचे हरिभाऊ पाटील
सांगोला / प्रतिनिधी महाराष्ट्रातील जनतेला सध्या परिस्थितीचा विचार केल्यास भाजप नको आहे भाजप पक्षाकडून आतापर्यंत मोठया प्रमाणावर पोकळ आश्वासने देण्यात आली आहेत भाजपचे सरकार आल्यापासून चार- पाचशे रुपयाचा घरगुती गॅस सिलेंडर अकराशे रुपये पर्यंत गेला आहे बेभान महागाई भाजप पक्षांना केली आहे
यामध्ये गोरगरीब वंचित भरडला जाऊन त्यांच्यावर आणखीन जास्त प्रमाणात बेरोजगारी आली आहे त्यामुळेजनतेला भाजप नको आहे परिवर्तनाची नांदी इथून पुढे होणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे नेते हरिभाऊ पाटील यांनी केले.
सांगोला तालुक्यामध्ये सुद्धा काँग्रेसला मानणारी जनता आहे भाजप सरकारकडून निवडून आल्यापासून नुसती आश्वासने देण्यात आली आहेत सांगोला तालुक्यातील जनता आता हुशार आहे तालुक्यामध्ये कांग्रेसच्या विचारधारेला इथून पुढे चांगले दिवस येणार आहेत. भांडवलशाही, हक मशाही करणारा हा भाजप पक्ष आहे.
यापक्षाने मोठ्या प्रमाणात महागाई नेऊन ठेवली आहे. पुण्यातील कसव्याचा विचार केल्यास जनतेने रवींद्र धगेकर यांना मोठा कॉल दिला आहे. कारण त्यांच्या विजयाने आपणाससमजते जनतेला भाजप पक्ष नको आहे. हा जनतेचा विजय आहे.
भाजप हा हुकूमशाहीकडे जाणारा पक्ष असल्याने जनतेच्या लक्षात आले आहे त्यामुळे जनतेला लोकशाही हवी आहे भांडवलशाही,जनतेला भाजप सरकार हुकूमशाही, भांडवलशाही कडे जाणारा पक्ष नको आहे.
या भाजप सरकारने महागाई मोठ्या प्रमाणावर वाढवून गोरगरीब जनतेचे हाल केले आहेत. हा पक्ष फक्त भांडवलशाहीचा हुकूमशाही कडे जाणार आहे. जनतेला लोकशाहीच्या मार्गाने जाणारा कांग्रेस पक्ष असल्यामुळे सांगोला तालुक्यात काँग्रेसला चांगले दिवस येणार!
काँग्रेसचे हरिभाऊ पाटील
हुकूमशाही नको आहे. काँग्रेस पक्ष हा लोकशाही मार्गाने जाणारा असल्याने या पक्षाला सांगोला तालुक्यामध्ये चांगले दिवस येणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील यांच्याकडून देण्यात आली.


0 Comments