google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला पोलीसांची धडाकेबाज कामगिरी नाझरे मठ ता. सांगोला येथे पोलीस पथकाने 17 हजार 690 रुपये किमतीची अवैध दारू पकडली

Breaking News

सांगोला पोलीसांची धडाकेबाज कामगिरी नाझरे मठ ता. सांगोला येथे पोलीस पथकाने 17 हजार 690 रुपये किमतीची अवैध दारू पकडली

 सांगोला पोलीसांची धडाकेबाज कामगिरी नाझरे मठ ता. सांगोला येथे पोलीस पथकाने 17 हजार 690 रुपये किमतीची अवैध दारू पकडली

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)

सांगोला (प्रतिनिधी) उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने अवैध रित्या दारू विक्री करणाऱ्या एकास ताब्यात घेऊन त्याच्याकडून देशी विदेशी कंपनीच्या 17 हजार सहाशे 90 रुपये किमतीच्या दारू बाटल्या जप्त केल्याची घटना बुधवार दि.23 मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास नाझरे मठ ता. सांगोला येथील टोल नाक्याजवळ घडली आहे.

उपविभागीय अधिकारी मा.राजश्री पाटील नेम उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगळवेढा यांचे मार्गदर्शनाखाली अवैद्यधंद्यावर कारवाई करणेकामी पो कॉ सुनील मोरे, सपोफौ तोडले, पोकॉ मिसाळ असे मिळुन खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत अनकढाळ शिवारात आले असता

 बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, सांगोला ते मिरज जाणारे रोडचे बाजुस नाझरा मठ येथील टोल नाक्याजवळ हॉटेल राजहंसचेबाजुस एक इसम आडोशाला चोरून देशी विदेशी दारुची विक्री करीत आहे, 

अशी बातमी मिळाल्याने पोलिसांनी लागलीच रस्त्याने येणारे जाणारे दोन इसमांना पंच म्हणुन बोलावुन घेवुन त्यांना बातमीचा आशय समजावुन सांगुन ते पंच म्हणुन येण्यास तयार झाले नंतर पोलीस स्टाफ व पंच असे बातमीतील नमुद ठिकाणी गेले असता, 

हॉटेल राजहंसच्या आडोशाला एक इसम आपले समोर तिनखाकी रंगाचे बॉक्स घेवुन बसलेला दिसला असता त्याचा आम्हास बातमीप्रमाणे प्रोव्हीशन गुन्हाचे कामी संशय आल्याने त्यास बुधवारी दुपारी 4 वा.च्या सुमारास गराडा घालुन जागीच पकडले सदर पकडलेल्या इसमास पंचासमक्ष त्याचे नाव गाव विचारले असता

 त्याने त्याचे नाव हणमंत शामराव खरात व वय - 45 वर्षे रा. नाझरा ता. सांगोला असे असल्याचे सांगीतले. त्याचे कब्जातीलखाकी रंगाचे बॉक्स पंचासमक्ष तपासुन पाहिले असता त्यामध्ये 700 /- रु डीएसपी ब्लॅक कं च्या. 5 सीलबंद बाटल्या, 3200/-रु. मँगडॉल नं - 1 व्हिस्की कंपनीच्या 20 सीलबंद बाटल्या,

 420 /- रु. मँगडॉल नं - 1 रम कंपनीच्या 3 सीलबंद बाटल्या, 800 /- रु इम्पेरियल ब्लू कंपनीच्या 5 सीलबंद बाटल्या, 3990 /- रु. देशी दारू संत्रा कंपनीच्या 57 सीलबंद बाटल्या, 1260 /- रु. देशी दारु टंगो कंपनीच्या 18सीलबंद बाटल्या, 1540 /- रु किंगफिशर कंपणीची ॥ 

सिलबंद बाटल्या, 2220/- रू टुबर्ग कंपणीच्या 12 सिलबंद बाटल्या, 2660/- रू टुबर्ग कंपणीच्या 19 सिलबंद बाटल्या, 900/- रू रॉयल चॅलेंज कंपनीच्या 5 सीलबंद बाटल्या असा एकूण 17 हजार 690 /- रुपये किंमतीचा प्रोव्हीशन माल मिळुन आल्याने तो दारुबंदी गुन्ह्याचे तपासकामी सपोफो तोंडले यांनी जप्त केला आहे

 याबाबतपो. कॉ. सुनील मोरे यांच्या फिर्यादीनुसार हणमंत शामराव खरात वय 45 वर्षे, रा. नाझरा ता. सांगोला याचे विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 65 (ई) प्रमाणे फिर्याद दाखल केली आहे

Post a Comment

0 Comments