सांगोला नगरपरिषदेकडुन थकबाकीदारांचे गाळे व मालमत्ता सिल करण्यास सुरुवात
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)
सांगोला (प्रतिनिधी) सांगोला नगरपरिषदेमार्फत मागील दोन महिन्यांपासून कर वसुलीसाठी विशेष वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या विशेष वसुली मोहिमेअंतर्गत नगरपरिषद मालकीचा आरक्षण क्रमांक- 20 मधील शॉपिंग सेंटर मधील गाळा क्रमांक - 6 हा थकीत भाडे व कराच्या रकमेपोटी सिल करण्यात आला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीनेविशेष वसुली मोहीम राबविण्याबाबत नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडून वारंवार आढावा व सूचना देण्यात येत आहेत.
याचाच एक भाग म्हणून सौ. माधुरी पांडुरंग चव्हाण यांच्या नावे भाडेपट्टा पद्धतीने देण्यात आलेला आरक्षण क्रमांक - 20 मधील नगरपरिषद मालकीच्या शॉपिंग सेंटर मधील गाळा क्रमांक - 6 हा थकीत भाडे व कराच्या रकमेपोटी सिल करण्यात आला.
सदरगाळ्याची थकीत रक्कम 31 मार्च 2023 अखेर न भरल्यास गाळा नगरपरिषदेच्या ताब्यात घेण्यात येणार आहे.
ही कारवाई कर निरीक्षक तृप्ती रसाळ, सहा.मालमत्ता पर्यवेक्षक स्वप्निल हाके, इम्रान शेख, सिद्धेश्वर बनसोडे, आनंद हुलजंतीकर, ओंकार उकळे, रमेश मोरे यांच्या उपस्थितित करण्यात आली.
थकबाकी रकमांच्या वसुलीसाठी नगरपरिषदेकडूनवारंवार सूचना देऊनही थकबाकीच्या रकमा न भरणाऱ्यांकडील मालमत्ता सिल करण्यात येणार आहेत. तरी सर्व मालमत्ताधारकानी लवकरात लवकर कर भरणा करून नगरपरिषदेस सहकार्य करावे व कटू कारवाई टाळावी.
मुख्याधिकारी
नगरपरिषद सांगोला


0 Comments