सांगोला वाडेगाव येथील बंधाऱ्याचे दोन लाख ९ हजार रुपये किमतीचे १०२ लोखंडी दरवाजे गेले चोरीला
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)
सांगोला : अज्ञात चोरट्याने वाढेगाव ता. सांगोला येथील गोडाऊन मधील दोन लाख ९ हजार रुपये किमतीचे १०२ लोखंडी दरवाजे चोरून नेल्याची घटना घडली आहे.
पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी शैलेशकुमार सुखदेव पवार वय - ३४ वर्षे रा. पंढरपूर ता. पंढरपूर जि सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मौजे वाढेगाव येथील बंधाऱ्याचे बर्गे (दरवाजे) ठेवणेकरीता असलेले
शासकीय गोडावून समोर १ जुलै २०२२ रोजी माण नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधा-यावरील बर्गे (दरवाजे ) काढून शासकीय गोडावून समोर मौजे वाढेगाव येथे वक्र आकाराचे ४६ व सरळ आकाराचे ५६ दरवाजे ठेवले होते.
१ ऑक्टोबर रोजी फिर्यादी व सोबत.एस.जे. बनसोडे कालवा निरीक्षक सोबत असे पेट्रोलिंग करत माण नदीचे पुलाजवळ आले असता तेथे आम्ही काढुन ठेवलेले वक्र दरवाजे सुस्थितीत असल्याची खात्री केली होती.
त्यानंतर दि. २५ ऑक्टोंबर २०२२ रोजी पेट्रोलिंग करत असताना वाढेगाव येथील मान नदीवरील पुलाचे वक्र दरवाजे ठेवलेल्या ठिकाणी शासकीय गोडावून समोर दिसुन आले नाहीत, म्हणुन २८ ऑक्टोबर २२ रोजी दरवाजे चोरीस गेले बाबत सांगोला पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता
फिर्यादी व इतर कर्मचाऱ्यांनी दरवाज्याचा आजुबाजूस शोध घेतला परंतु बर्गे (दरवाजे ) मिळुन आले नाहीत, म्हणून मंगळवार दि. २१ मार्च रोजी सदरचे १०२ लोखंडी दरवाजे अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याबाबत फिर्याद दाखल केली आहे


0 Comments