google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वंचित गावांचा टेंभू योजनेमध्ये समावेश- आमदार शहाजीबापू पाटील

Breaking News

वंचित गावांचा टेंभू योजनेमध्ये समावेश- आमदार शहाजीबापू पाटील

 वंचित गावांचा टेंभू योजनेमध्ये समावेश- आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला/ प्रतिनिधी.(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)

 विधानसभा  निवडणुकीमध्ये शब्द दिल्याप्रमाणे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्यातील एक ही गाव शेतीच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करून सांगोला तालुक्यातील पाण्यापासून वंचित असणाऱ्या डोंगरगाव ,मानेगाव, हणमंतगाव, या गावांचा टेंभू योजनेमध्ये समावेश केला

सांगोला तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असणाऱ्या हटकर मंगेवाडी गावातून टेंभू योजनेचा कॅनॉल जातो 

गेल्या महिन्यांमध्ये आमदार आपल्या दारी अभियानासाठी आमदार शहाजीबापू पाटील  व माजी आमदार दीपकआबा साळुंखे - पाटील हटकर मंगेवाडी गावात गेले असता मुख्य कॅनॉल जात असून शेतकऱ्यांना त्याचा कोणताही फायदा होत 

नसल्याचे तेथील नागरिकांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या  निदर्शनास आणून दिले मुख्य कॅनॉल हा उतारावरून गेला आहे आणि लाभ क्षेत्रातील शेती  चढावर असल्याने योजनेचा कोणताही फायदा होत

 नसल्याचे दिसून आले  यावर आमदार शहाजीबापू पाटील यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना सूचना देऊन जत तालुक्यातील नवाळवाडी गावातून हटकर मंगेवाडी गावातील शेतीला पाणी मिळण्यासाठी सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या

 व सर्वेक्षणाच्या ठिकाणी स्वतः आमदार शहाजीबापू पाटील उपस्थित राहत सर्वेक्षण करून घेतले होते यामध्ये हटकर मंगेवाडी गावचा उर्वरित भाग गुनापवाडी ,जुजारपूर, डोंगरगाव, मानेगाव ,

 हणमंतगावच्या उर्वरित भागाला पाणी देण्यासाठी आमदार  शहाजीबापू पाटील यांनी चालू केलेल्या  प्रयत्नाला यश आले असून या गावातील वंचित भागाला पाणी मिळणार असल्याने या गावातील शेतकऱ्यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले दिसून येते

Post a Comment

0 Comments