google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक! ट्रॅक्टरच्या रोटरमध्ये अडकुन 12 वर्षीय बालकाचा मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील घटना

Breaking News

धक्कादायक! ट्रॅक्टरच्या रोटरमध्ये अडकुन 12 वर्षीय बालकाचा मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील घटना

 धक्कादायक! ट्रॅक्टरच्या रोटरमध्ये अडकुन 12 वर्षीय बालकाचा मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील घटना

शेतात रोटरत असताना ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या बारा वर्षे बालकाचा रोटर मध्ये अडकून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवेढा तालुक्यात घडली आहे.

सुरेश शरणाप्पा खांडेकर (वय 12 रा.कात्राळ ता.मंगळवेढा) असे मयत झालेल्या बालकाचे नाव आहे. याची फिर्यादी वडील शरणाप्पा सिद्राया खांडेकर (वय 35) यांनी दिली आहे.

याप्रकरणी अनोळखी ट्रॅक्टर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, काल दि.23 मार्च रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास फिर्यादीचा मुलगा सुरेश खांडेकर हा कात्राळ शिवारातील प्रमोद खडु पांढरे यांचे शेतात लाल रंगाचा स्वराज्य 724 कंपनीचा बिगर नंबरचा ट्रॅक्टर वरील अनोळखी चालक याने त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर हा जोराने,

 हयगयीने तेथील परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन चालविल्याने फिर्यादीचा मुलगा ट्रॅक्टरच्या मटगार्ड वर बसला असता ट्रॅक्टरमधुन पडुन पाठीमागील टायरखाली जाऊन रोटरमध्ये अडकुन गंभीर जखमी होऊन मयत झाला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बापूसाहेब पिंगळे, पोलीस हवालदार नवले आदींनी भेट दिली आहे.

Post a Comment

0 Comments