google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डॉ.सूरज सोनलकर यांनी वैद्यकीय सेवेसोबत सामाजिक बांधिलकी जपावी – दिपकआबा साळुंखे-पाटील

Breaking News

डॉ.सूरज सोनलकर यांनी वैद्यकीय सेवेसोबत सामाजिक बांधिलकी जपावी – दिपकआबा साळुंखे-पाटील

डॉ.सूरज सोनलकर यांनी वैद्यकीय सेवेसोबत सामाजिक बांधिलकी जपावी – दिपकआबा साळुंखे-पाटील

जवळा येथे सोनलकर हॉस्पिटलचे उदघाटन संपन्न

सांगोला : वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या प्रामाणिक आणि तरुण मित्रांचे भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे. 

आगामी काळात डॉ.सूरज सोनलकर यांनी वैद्यकीय सेवा करत असताना सामाजिक बांधिलकीही जपावी आणि यातून समाजकार्य करावे,असे प्रतिपादन माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी केले.

जवळा (ता.सांगोला) येथील डॉ.सूरज सोनलकर यांच्या “सोनलकर हॉस्पिटल”चे उदघाटन माजी आमदार दिपकआबांच्या हस्ते संपन्न झाले,त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जवळा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अरुणभाऊ घुले,सुनिल साळुंखे,उपसरपंच नवाज खलिफा,

ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय बर्वे, विजयकुमार तारळकर,बिनू गयाळी, प्रमोद साळुंखे-पाटील,शिवाजी कोळेकर,मैनुद्दीन खलीफा, साहिल इनामदार,टिपू नाडीवाले,रामचंद्र आगलावे आदींसह जवळा परिसरातील नागरिक उपस्थित होते.

यासमयी बोलताना दिपकआबा पुढे म्हणाले की, देशावर नव्हे तर संपूर्ण जगावर आलेल्या कोरोनाच्या महाभयानक संकटावेळी आरोग्यसेवा किती महत्त्वाची आहे,याची प्रचिती आली. आजही आपल्या समाजात डॉक्टरला देव समजले जाते.

आजारी व्यक्ती संपूर्ण विश्वासाने उपचारासाठी डॉक्टरकडे जातात.वैद्यकीय क्षेत्रातील कोणतेही ज्ञान सामान्य लोकांना नसल्याने

 ते पूर्णपणे डॉक्टरवर विश्वास ठेवतात,हाच विश्वास सार्थ ठरविण्याची जबाबदारी आता डॉ.सूरज सोनलकर यांच्यावर आली आहे.

 डॉ.सूरज हा विश्वास निश्चित सार्थ ठरवतील आणि लवकरच आपल्या कामाने केवळ जवळा परिसरातच नाहीतर, संपूर्ण तालुक्यात वैद्यकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा भरीव ठसा उमटवतील, 

असा आशावाद शेवटी दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी व्यक्त केला आणि सोनलकर हॉस्पिटलच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या समारंभाचे प्रास्ताविक श्रीपती वगरे यांनी केले.

Post a Comment

0 Comments