सांगोला ज्योती क्रांती परिषदेच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी विशाल गोडसे यांची नियुक्ती
सांगोला / प्रतिनिधी( शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)
ज्योती क्रांती परिषदेच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी विशाल गोडसे यांची नियुक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांच्या हस्ते पत्र देऊन करण्यात आली.
यावेळी बोलताना रमेश बारसकर म्हणाले, ५२ टक्के असणाऱ्या ओबीसी समाजाचा मुख्यमंत्री आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये होऊ शकला नाही,
हे बहुसंख्येने असणाऱ्या ओबीसी समाजाचे दुर्देव आहे. येत्या काळात ज्योती क्रांती परिषद महाराष्ट्र प्रदेशच्या माध्यमातून ओबीसींचे संघटन करुन आपल्या हाक्काचा लढा उभा करायचा आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली.
तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून महात्मा ज्योतिबा फुले यांनी मोठी श्रीमंती असताना सुद्धासमाजासाठी झोकून देऊन सामाजिक काम केले. ज्योतिबा फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वचितांसाठी काम उभं केलं,
त्याचप्रमाणे या महापुरुषांनी बनवून दिलेल्या वाटेवर त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी ज्योती क्रांती परिषदेच्या माध्यमातून आपण काम करणं गरजेचं आहे.
या कार्यक्रमासाठी भटक्या विमुक्त जातीचे अध्यक्ष मच्छिद्र भोसले, माजी जि.प. सदस्य अरूण तोडकर, ज्योती क्रांती परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष माणिक पिसे, प्रवक्ते शिलवंत क्षीरसागर, सांगोल्याचे नगरसेवक गणेश राऊत, सोमनाथ आदलिंगे, संतोष टाकळे, कुलदिप आहेरकर आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.


0 Comments