google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ज्येष्ठ नागरिकांनसाठी मोफत देवदर्शन योजना.

Breaking News

ज्येष्ठ नागरिकांनसाठी मोफत देवदर्शन योजना.

 ज्येष्ठ नागरिकांनसाठी मोफत देवदर्शन योजना. 

ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास योजना सुरू केल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार आता आणखी मोठी योजना आखण्याच्या तयारीत आहे.यानुसार राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत देवदर्शन करता येणार आहे.

 खुशखबर…! आपल्या आजोबांनी किंवा वडिलांनी विकलेली जमीन परत मिळणार फक्त 2 दिवसात.

एसटी महामंडळामार्फत नागरिकांना तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याकरता मेगा प्लान आखण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

त्यामुळे लवकरच याबाबत शासननिर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील ६५ वर्षांवरील नागरिकांना ५० टक्के सवलत आणि ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत एसटी बससेवा सुरू करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला होता. या योजनेला ज्येष्ठ नागरिकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. आता ज्येष्ठांना आणखी खूष करण्याकरता शिंदे फडणवीस सरकार मोफत देवदर्शन घडवणार आहे. याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश एसटी महामंडळाला देण्यात आले आहेत.

तर प्रत्येक शनिवारी-रविवारी ज्येष्ठ नागरिक मोफत देवदर्शन करू शकणार आहेत. यासाठी दोन हजार एसटी उपलब्ध करून देण्याची तयारी एसटी महामंडळाने दाखवली आहे.

या सेवेचा लाभ घेताना केवळ प्रवास मोफत असणार आहे. प्रवासादरम्यान ज्येष्ठ प्रवाशांना राहण्याचा आणि जेवणाचा खर्च करावा लागणार आहे.

कोणत्या  तीर्थक्षेत्रांना देता येणार भेट ?

मोफत देवदर्शन :-पंढरपूर-तुळजापूर-अक्कलकोट, अष्टविनायक दर्शन, शिर्डी, शेगाव, कोल्हापूर, ज्योतिबा दर्शन आदी तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याकरता हा प्रवास मोफत करण्यात येणार आहे.

आणी , या तीर्थक्षेत्रांमध्ये असलेल्या धर्मशाळा, यात्रीनिवास येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव खोल्या ठेवण्यात येणार आहेत.

महसूल  किती व कसा मिळेल?

मोफत देवदर्शन :-शनिवारी-रविवार शासकीय कार्यालये आणि शाळा-महाविद्यालये बंद असतात. परिणाणी या दोन्ही दिवशी एसटीचा महसूल घटतो. त्यामुळे सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत देवर्शनाचा प्लान आखला असण्याची शक्यता आहे.जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांसोबत कोणी आल्यास त्यांच्याकडून महसूल मिळण्याची शक्यता असल्याचं वर्तवलं जातंय.

मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

मोफत देवदर्शन :-राज्यात जवळपास १ कोटींच्या आसपास ज्येष्ठ नागरिक आहेत. म्हणजेच, हा सर्वांत मोठा मतदारवर्ग आहे. या मतदार वर्गाला आपल्याकडे खेचून घेण्याकरता शिंदे फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Post a Comment

0 Comments