google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आठ महिन्याच्या गर्भवतीला बाईकला बांधून फरफटत नेलं

Breaking News

आठ महिन्याच्या गर्भवतीला बाईकला बांधून फरफटत नेलं

 आठ महिन्याच्या गर्भवतीला बाईकला बांधून फरफटत नेलं 

कंझावला प्रकरणानंतर देशाचं वातावरण ढवळून निघालेलं असताना उत्तर प्रदेशच्या पीलीभीत येथे असाच संतापजनक प्रकार घडला आहे. आपल्या आठ महिन्यांच्या गर्भवती पत्नीला बाईकसोबत बांधून नवऱ्याने गावातील गल्ल्यांमध्ये फरफटत नेल्याची घटना घडली आहे.

 घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेतील आरोपी नवऱ्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना घुंघचाई गावातील आहे. पीडित महिलेच्या नवऱ्याला दारूचं व्यसन आहे.

 त्याचं नाव राम गोपाल असं आहे. शनिवारी या जोडप्यामध्ये काही वाद झाला होता. त्या वादामुळे चिडलेल्या रामगोपाल याने बायकोला ठार मारण्याच्या हेतून बाईकला बांधलं आणि तिला गावातील गल्ल्यांमध्ये फरफटत घेऊन गेला.

राम गोपाल याला पोलिसांनी अटक केली असून पीडितेवर उपचार सुरू आहेत. पीडिता आठ महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती मिळत आहे. नवऱ्यानेच आपल्याला बाईकला बांधून फरफटत नेल्याचा जबाब महिलेने दिला आहे.

Post a Comment

0 Comments